घरलाईफस्टाईलघरच्या घरी बनवा फेस स्क्रब....

घरच्या घरी बनवा फेस स्क्रब….

Subscribe

महिला असो किंवा पुरुष आपण कसे सुंदर दिसू यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात. प्रेझेंटेबल राहायला कुणाला आवडत नाही? सगळीच तरुणाई आपल्या सौंदर्याची विशेष काळजी घेताना दिसते. धावपळीच्या जीवनशैलीत जगताना स्वतःकडे बर्‍याचदा दुर्लक्ष होताना दिसते. अशावेळी बाजारात उपलब्ध असणार्‍या अनेक सौंदर्य प्रसाधनांचा सर्रास वापर केला जातो. त्याच्या किमती अधिक असतात. परंतु त्याचे दुष्परिणाम देखील होऊ शकतात. हे दुष्परिणाम टाळण्यासाठी घरच्या घरी त्वचेची काळजी घेता येते.

* दुधाच्या सायीमध्ये हळद पावडर मिक्स करून हलक्या हाताने चेहर्‍यावर लावल्यास त्वचा चमकदार होते. तसेच चेहर्‍यावरील मुरूम कमी करण्यासाठी कच्च्या दुधात हळद मिक्स करून लावल्यास चेहर्‍यास फायदेशीर ठरते.

* चेहर्‍यावर मुरुमांचे डाग असतील तर दोन बदाम बारीक करून त्यात थोडे दूध टाकावे आणि एक चमचा संत्र्याच्या सालीची पावडर त्यात मिक्स करून या मिश्रणाने चेहर्‍यावर मसाज करून काही वेळानंतर चेहरा थंड पाण्याने धुवावा. मुरुमांचे डाग कमी होतील.

- Advertisement -

* कोरडी त्वचा असल्यास रात्रभर दुधात काही काजू भिजवून त्याची पेस्ट करून मुलतानी मातीमध्ये मधाच्या ४ ते ५ थेंबासोबत मिक्स करून हा स्क्रब चेहर्‍यावर लावल्याने कोरड्या त्वचेस उपयुक्त ठरतो.

* चेहर्‍यावरील तेलकटपणा कमी करण्यासाठी तांदळाच्या पिठात पुदिनाचा अर्क किंवा गुलाबपाणी मिक्स करून १० ते १५ मिनिटे चेहर्‍यावर या मिश्रणाने स्क्रब करा. नंतर चेहरा स्वच्छ थंड पाण्याने धुवा.

- Advertisement -

* चेहरा तजेलदार आणि चमकदार दिसण्यासाठी बेसन पीठाने चेहर्‍यावर मसाज करा. चेहर्‍यावर ग्लो येईल.

* आठवड्यातून एकदा तरी घरगुती फेसपॅकचा वापर करावा. यामध्ये मुलतानी माती, चंदन, थोडीशी हळद आणि गुलाबपाणी यांचे एकत्रित मिश्रण तयार करून २० मिनिटे चेहर्‍यावर लावा. हे फेसपॅक सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -