घरमुंबईडॉक्टर महिलेवर लैंगिक अत्याचार

डॉक्टर महिलेवर लैंगिक अत्याचार

Subscribe

मरिनलाइन्स येथील एका नामांकित हॉस्पिटलमधील 40 वर्षीय डॉक्टर महिलेवर लैंगिक अत्याचार करुन तिची फसवणूक करण्यात आली आहे.

मरिनलाइन्स येथील एका नामांकित हॉस्पिटलमधील 40 वर्षीय डॉक्टर महिलेवर लैंगिक अत्याचार करुन तिची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी कुणाल पुखराज हिंगर या व्यापार्‍याला बुधवारी अंधेरी पोलिसांनी अटक केली आहे. त्याला अंधेरी कोर्टाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

विलेपार्लेत राहणार्‍या कुणालला तीन वर्षांपूर्वी या डॉक्टरचा मोबाईल क्रमांक मिळाला होता. त्याने व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून डॉक्टर महिलेशी संपर्क साधून तिच्याशी मैत्री केली.सप्टेंबर 2015 रोजी कुणालने अंधेरी येथे राहणार्‍या बहिणीच्या घरी तिला जेवणासाठी बोलाविले होते. जेवणानंतर त्याचे आई-वडील नातेवाइकांकडे निघून गेले. यावेळी घरात कोणीही नसल्याचा फायदा घेऊन त्याने तिच्याशी जबदस्तीने शारीरिक संबंध केले. तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी लैंगिक संबंध करत राहिला.

- Advertisement -

कुणालकडून होणार्‍या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून तिने आझाद मैदान पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी बलात्कार, फसवणुकीचा गुन्हा नोंदवून त्याचा तपास अंधेरी पोलिसांकडे वर्ग केला होता. या गुन्ह्याचा तपास हाती येताच त्याला बुधवारी पोलिसांनी चौकशीसाठी बोलाविले होते. त्याची जबानी नोंदवून नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला गुरुवारी अंधेरीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून जवळीक

व्यवसायात झालेले कोट्यवधी रुपयांचे नुकसान, आई-वडिलांचा आजार आणि त्यातून आलेल्या नैराश्याबाबत सांगून त्याने डॉक्टर महिलनेशी आपुलकी निर्माण केली. सतत व्हॉट्सअ‍ॅप चॅट आणि मोबाईल संभाषणातून त्याने तिच्या चांगली मैत्री संपादन केली.

- Advertisement -

१४ लाखांची फसवणूक

कुणाल डॉक्टरवर संशय घेऊन भांडण करु लागला होता. सतत होणार्‍या भांडणाला कंटाळून तिने त्याच्याशी असलेले संबंध तोडून टाकले होते. याच कालावधीत कुणालने तिला विविध आमिषे दाखवून 14 लाख 75 हजार रुपये घेतले होते. वारंवार मागणी करुनही तो ही रक्कम परत करीत नव्हता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -