घरमुंबईलॉ शाखेची परीक्षा पुढे ढकलली

लॉ शाखेची परीक्षा पुढे ढकलली

Subscribe

मुंबई विद्यापीठातर्फे घेण्यात येणारी लॉ शाखेच्या द्वितीय वर्षे आणि पाच वर्षे एलएलबीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय अखेर परीक्षा विभागाने घेतला आहे. या दोन्ही परीक्षा आणि कंपनी सेक्रेटरी ही परीक्षा एकाच दिवशी येत असल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत होती. त्यानुसार मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने हा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानुसार या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

मुंबई विद्यापीठाच्या लॉ शाखेच्या विद्यार्थ्यांनी आणि स्टुडंट लॉ कौन्सिलने परीक्षा एकाच दिवशी येत असल्याने परीक्षा विभागाकडे धाव घेतली होती. कंपनी सेक्रेटरी या अभ्यासक्रमात बदल होणार असून जुन्या अभ्यासक्रमातून आतपर्यंत अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांना डिसेंबर महिन्या होणारी परीक्षा शेवटची संधी असणार आहे. यामुळे स्टुटंड लॉ कौन्सिलने मुंबई विद्यापीठाकडे एलएलबीच्या सत्र तीनची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. यानुसार मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. सुधाररीत वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने परिपत्रकात नमूद केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -