घरमुंबईबिरवाडी गावात दिसला बिबट्या !

बिरवाडी गावात दिसला बिबट्या !

Subscribe

नागरिकांमध्ये भीती

नाशिक परिसरात सतत होणारा मुसळधार पाऊस आणि पुरामुळे भक्ष्याच्या शोधत सोमवारी रात्री बिरवाडी गाव वस्तीत शिरलेला एक बिबट्या गावकर्‍यांच्या नजरेस पडला. गावात बिबट्या आल्याच्या भीतीने ग्रामस्थांमध्ये एकच भीती पसरली. बिबट्याचा शोध घेण्यासाठी वन विभागाने या भागात कॅमेरे लावले आहेत.

शहापूर तालुक्यातील बिरवाडी गावातील रहिवासी लता खाडे या महिलेला सोमवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास घराच्या मागील आवारातील बाजूस सरपण ठेवलेल्या एका ढिगार्‍यावर बिबट्या पाठमोर्‍या स्थितीत बसलेला दिसला. बिबट्याला या महिलेने घाबरून आरडाआरोडा करताच बिबट्या पसार झाला. त्यानंतर बिबट्याच्या शोधात ग्रामस्थ गोळा झाले. ग्रामस्थांना गावातील परिसरातच जमिनीवर चिखलात बिबट्याच्या पाऊलखुणा आढळून आल्या.

- Advertisement -

या घटनेची माहिती बिरवाडी गावकर्‍यांनी त्वरीत शहापूर वन विभागाला कळविताच शहापूरचे वन परिक्षेत्र अधिकारी प्रकाश चौधरी, वन परिक्षेत्र अधिकारी एम.एस.बोठे, खर्डी वन परिक्षेत्र अधिकारी पी.एस.देशमुख,बिरवाडी वनपाल भांगरे वनरक्षक तलपाडे राकेश जागले योगेश पाटील, राजेश झोले या वन अधिकारी व कर्मचार्‍यांनी बिरवाडी गावात धाव घेतली. चिखलातील ठसे बिबट्याचेच असल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी प्रकाश चौधरी यांनी आपलं महानगरला माहिती देताना सांगितले. हा बिबट्या नाशिक जिल्ह्यातील जंगल पट्ट्यातून स्थलांतरित होऊन आला असवा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. हे ठसे तपासणीसाठी वन्यजीव तज्ज्ञांकडे पाठविले जाणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -