घरमुंबईपूर ओसरला तरी भातशेती पाण्याखालीच

पूर ओसरला तरी भातशेती पाण्याखालीच

Subscribe

शेतकर्‍यांचे मोठे नुकसान ,शेतकरी हवालदील

गेल्या चार दिवसांपासून कोसळणार्‍या पावसाने थोडी उसंत घेतली आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील पूर ओसरला आहे. मात्र खाडी किनारी असलेल्या अनेक गावांमधील भातशेती पाचव्या दिवशीही पाण्याखाली असल्याने भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

बहुप्रतिक्षेनंतर पावसाने हजेरी लावल्याने शेतीच्या कामांना वेग येऊन बळीराजा सुखावला होता. त्यामुळे शेतकर्‍यांनी भात लावणीच्या कामाला सुरुवात केली होती. मात्र शुक्रवारपासून जोरदार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याने तालुक्यातील खाडी किनारी असलेल्या डुंगे, वडघर, वडूनवघर, खारबांव, जुनांदुर्खी, टेंभवली, कोनगांव, पिंपळास, मालोडी, खार्डी, पाये, पायगांव, केवणीदिवे, अंजुर, अलीमघर, वेहळे, भरोडी आदी गावातील भातशेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे भातपीक कुजून शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतीचत्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू झाले असून बाधित शेतकर्‍यांना भरपाई देण्यात येईल, असे भिवंडीचे तहसीलदार शशिकांत गायकवाड यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -