घरमुंबईधोकादायक शाळेत शिक्षणाचे धडे

धोकादायक शाळेत शिक्षणाचे धडे

Subscribe

चांदरोटी शाळेची इमारत कोसळण्याची भीती

शहापूर पासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या चांदरोटी येथील जिल्हापरिषदेच्या वर्ग खोल्यांच्या भिंतीना व स्लॅबला तडे गेल्याने शाळेची इमारत धोकादायक झाली आहे. या पडझड झालेल्या इमारतीच्या वर्ग खोल्यांत जीव धोक्यात घालून एकूण 110 विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवीत आहेत. या धोकादायक इमारतीमुळे विद्यार्थ्यांसह पालक चिंतेत सापडले आहेत. शाळेच्या या धोकादायक इमारतीकडे शहापूर शिक्षण विभागासह जिल्हा परिषदेने दुर्लक्ष केल्याचा आरोप चांदरोटी ग्रामस्थांनी केला आहे.

तालुक्यातील चांदरोटी येथे ठाणे जिल्हापरिषदेच्या अंतर्गत येणारी इयत्ता 1 ली 7 वी पर्यंतची प्राथमिक शाळा आहे. या शाळेत चांदरोटी गावासह शेकटपाडा, पाचलकरपाडा, कराडे या परिसरातील मुले, मुली शिक्षण घेतात. मात्र चांदरोटी शाळेच्या इमारतीची देखभाल दुरुस्तीअभावी प्रचंड दुरवस्था झाल्याचे समोरयेत आहे. या शाळेच्या दोन वर्ग खोल्या या 35 वर्षांपूर्वीच्या जुन्या आहेत.

- Advertisement -

शाळेच्या इमारतीतीमधील काही वर्ग खोल्या 2003 ते 2004 साली बांधण्यात आलेल्या आहेत. सद्य स्थितीत या शाळेच्या इमारतीची प्रचंड दुर्दशा झाली आहे. इमारतीच्या छताच्या बिमला देखील तडे गेले आहेत. खोल्यांच्या खिडक्यांची दैन्यवस्था झाली आहे. अशी परिस्थिती असल्याने एका वर्ग खोलीत तर चक्क तीन वर्गातील मुला मुलींना अगदी दाटीवाटीने बसवून तर काही विद्यार्थ्यांना तर शाळेच्या व्हरांड्यातच बसून शिक्षणाचे धडे गिरविण्याची वेळ आली आहे.

चांदरोटी शाळेची इमारतीची दुरवस्था झाल्याने ही इमारतीच्या काही वर्गखोल्या धोकादायक असल्याचे घोषित करण्यात आल्या असून तसा प्रस्ताव ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकार्‍यांना पाठविण्यात आला आहे. -हिराजी वेखंडे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी, शहापूर

- Advertisement -

चांदरोटी शाळेच्या जीर्ण अशा इमारतीच्या वर्ग खोल्यात कसेबसे जीव मुठीत घेऊन मुलांना शिक्षण घ्यावे लागत आहे. यामुळे मुलांच्या जिवीताला धोका आहे शिक्षण विभागाने याची गंभीर दखल घेऊन ही जुनी पडझड झालेली इमारत तात्काळ पाडून त्या ठिकाणी नवीन शाळेची इमारत बांधण्यात यावी, अशी आमची ग्रामस्थांची मागणी आहे .
– मालु मांजे, आवाळे चांदरोटी ग्रुप ग्रामपंचायत तंटामुक्ती अध्यक्ष

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -