घरमुंबईलोकसभेसाठी ठाण्यात उमेदवार ठरेना

लोकसभेसाठी ठाण्यात उमेदवार ठरेना

Subscribe

भाजप, सेनेत अस्वस्थता

लोकसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असला तरी ठाण्यात अद्यापही आघाडी आणि युतींच्या उमेदवारांचे तळ्यात मळ्यातच सुरू आहे. भाजपाने अंतर्गत धुसफुस सुरू केल्याने विद्यमान खासदार राजन विचारे यांनाच पुन्हा तिकीट द्यायचे की नाही, यावर सेनेत खलबते सुरू झाली आहेत. भाजपाच्या नगरसेवकांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच याबाबत विचारणा केल्याने जबरदस्तीने उमेदवार लादला गेला तर कदाचित त्याचा परिणाम वेगळा घडू शकेल, अशी भीती सेनेला वाटू लागली आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादीला उमेदवारच सापडत नसल्याने उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात घालावी हा प्रश्न पडला आहे.

बहुचर्चित असलेली शिवसेना आणि भाजपमध्ये युती झाली असली तरी मात्र काही ठिकाणी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची मने मात्र जुळलेली दिसत नाहीत. युती झाल्याने ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे विद्यमान खासदार राजन विचारे हेच लोकसभेचे उमेदवार असतील हे ओघानेच आले, परंतु मेरीटनुसार ही जागा भाजपाला द्यावी, अशी मागणी भाजपाच्या नगरसेवकांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या मतदारसंघात भाजपाचे विधानसभेत मंदा म्हात्रे, नरेंद्र मेहता, संजय केळकर तर निरंजन डावखरे आणि रमेश पाटील हे विधान परिषदेचे आमदार आहेत, परंतु शिवसेनेचे मात्र विधानसभेत एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक हे दोन आणि रविंद्र फाटक हे विधान परिषदेचे आमदार आहेत. त्यामुळे या संख्याबळाचा विचार केल्यास मेरीटनुसार भाजपाच आघाडीवर आहे. त्यामुळे ही जागा भाजपाला सोडावी. इतकेच नव्हे जर ही जागा भाजपाला सोडली नाही, तर निवडणुकीचे कामही करणार नाही असा इशाराही नगरसेवकांनी दिला आहे. भाजपच्या या धक्क्याने सेनेच्या गोटात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. युती नसताना खासदार राजन विचारे यांनी भाजपाचे आमदार आणि नगरसेवकांशी राजकीय वाद झाले होते. त्यामुळे या दोघांमध्ये आता लोकसभेसाठी जरी युती झाली तरी मने राजकीय मने जुळतील का? असा प्रश्न आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -