घरमुंबईराज ठाकरेंच्या भोंगा अल्टिमेटमनंतर मुंबई पोलीस अॅक्शन मोडमध्ये; दंगल झाल्यास पाच मिनिटात...

राज ठाकरेंच्या भोंगा अल्टिमेटमनंतर मुंबई पोलीस अॅक्शन मोडमध्ये; दंगल झाल्यास पाच मिनिटात पोहोचणार

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे काढण्यासाठी 3 मेपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. या पार्श्वभूमीवर आता मुंबई पोलीस अॅक्शन मोडमध्ये आल्याचे दिसतेय. या दिवशी मुंबईत कोणताही अनुचित प्रकार किंवा दंगलसदृष्य स्थिती निर्माण होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांकडून योग्यती कडक खबरदारी घेतली जात आहे. मुंबई शहर आणि उपनगरात अनुचित प्रकार घडल्यास मुंबई पोलीस पाच मिनिटात आता घटनास्थळी पोहणार असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे.

राज ठाकरेंच्या भोंग्यावरील अल्टिमेटनंतर मुंबई पोलिसांनी योग्यती तयारी पूर्ण केली आहे. दंगल झाल्यास त्याठिकाणी पाच मिनिटात पोहचण्यासाठी मुंबई पोलीस सज्ज झालेत. यासाठी मुंबईत एसआरपीएफचे 57 पथकं आणि 6 दंगल नियंत्रण पथकं तैनात करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

यासाठी मुंबई शहरातील संवेदनशील आणि असंवेदनशील भागांची पाहणी करण्यात आली आहे. तसेच शहरातील 94 पोलीस स्थानकात 1504 पॉइंट्स बनवण्यात आले आहेत. प्रत्येक पोलीस स्थानकात 4 बीट चौकी असते. या बीटमध्ये 4 पॉईंट्स ठरवण्यात आलेत. म्हणजे A,B,C,D प्रमाणे बीट चौक्या काम करतील. यातील प्रत्येक पोलीस स्थानकात 16 पॉइंट्स असणार आहेत. यामार्फत शहरात 24 तास पेट्रोलिंग केले जाईल.

मुंबई पोलिसांकडे कोणताही अनुचित प्रकार घडल्यास घटनास्थळी तातडीने पोहण्याची क्षमता असलेले 33 पथकं आहेत. यातील 15 पथकं ही लॉ अॅन्ड ऑर्डरचे पालन करण्यासाठी तैनात आहेत. यात लोक आर्म्स डिव्हीजन पोलिसांचाही समावेश आहे. या प्रत्येक पथकामध्ये Riot control police ची 6 पथके तयार केली आहेत. या RCP च्या प्रत्येक पथकामध्ये 14 जणांचा समावेश आहे. तसेच डेल्टा टीम देखील तयार केली आहे. याशिवाय प्रत्येक पोलीस स्थानकात दोन पोलीस कॉन्स्टेबल तैनात करण्यात आले आहेत.


Palm Oil Price Hike : ‘या’ देशात पाम तेल प्रतिलिटर 22 हजार रुपये; ‘हे’ आहे कारण


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -