घरपालघरमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आयुक्त दिलीप ढोले यांचा सत्कार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आयुक्त दिलीप ढोले यांचा सत्कार

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांचा सत्कार करण्यात आला.

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान या स्पर्धा अंतर्गत मिरा भाईंदर महानगरपालिकेने सेवा हमी कायद्याअंतर्गत ४८ विविध प्रकारच्या सेवा नागरिकांना उपलब्ध करून दिली. त्यामुळे महापालिकेला तृतीय क्रमांकाने मानांकित करून गुरुवारी सह्याद्री गेस्ट हाऊस, मुंबई येथे नागरी सेवा दिन कार्यक्रम २०२२ अंतर्गत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे आदी मान्यवर उपस्थितीत होते.

२०२१-२२ या वर्षापासून राज्यात तालुका, जिल्हा विभाग व राज्यस्तरावर राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानाच्या अनुषंगाने स्पर्धेचे प्रस्ताव सादर करण्यासाठी पंतप्रधान पारितोषिक योजनेच्या धर्तीवर ऑनलाईन पोर्टल विकसित करण्यात आले होते. स्पर्धेसाठी राज्यातील सर्व महापालिकांनी ऑनलाईन प्रस्ताव सादर केले होते. या अभियानातंर्गत राज्यस्तरावर प्राप्त प्रस्तावांची छाननी राज्यस्तरीय निवड समितीमार्फत करण्यात आली. २०२१-२०२२ करिता अंतिम पारितोषिक विजेत्यांची निवड करण्यात आली असून महापालिकेने सेवा हमी कायद्याअंतर्गत ४८ विविध प्रकारच्या सेवा नागरिकांना उपलब्ध करून दिल्याने महापालिकेला तृतीय क्रमांकाने मानांकित करून गुरुवारी सह्याद्री गेस्ट हाऊस, मुंबई येथे नागरी सेवा दिन कार्यक्रम २०२२ अंतर्गत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते आयुक्त दिलीप ढोले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपायुक्त (मुख्यालय) मारुती गायकवाड व उपायुक्त (संगणक) संजय शिंदे उपस्थित होते.

- Advertisement -

महापालिकेमार्फत सेवा हमी कायद्याअंतर्गत मालमत्ता कर विभागामार्फत १४ सेवा, पाणी पुरवठा विभागामार्फत १४ सेवा, व्यवसाय परवाना विभागामार्फत १० सेवा, आरोग्य विभागामार्फत २ सेवा, विवाह प्रमाणपत्र सेवा, ना-हरकत प्रमाणपत्र (अग्निशमन) सेवा, ना-हरकत प्रमाणपत्र (इतर) सेवा, नगर रचना विभागामार्फत ५ सेवा अश्या एकूण ४८ सेवा महापालिका सेवा हमी कायद्याअंतर्गत शहरातील नागरिकांना www.mbmc.gov.in या संकेतस्थळामार्फत देण्यात येत आहे. तरी मिरा भाईंदर शहरातील सर्व नागरिकांनी या संकेतस्थळाला भेट देऊन सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा –

वीजटंचाईमुळे राज्यात अखेर लोडशेडिंग होणार, विजेच्या वापरात काटकसर करा – नितीन राऊत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -