घरमुंबईPolitics : विरोधकांच्या मागे केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लावणे ही भाजपाची संस्कृती; शिंदे...

Politics : विरोधकांच्या मागे केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लावणे ही भाजपाची संस्कृती; शिंदे गटाचा हल्लाबोल

Subscribe

विरोधकांच्या मागे केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लावणे ही भाजपाची संस्कृती आहे, असे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांनी केले आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदार पुढील काही दिवसात होणार आहे. परंतु अद्यापही महायुतीत काही जागांवर रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे महायुतीतील काही नेते एकमेकांविरोधात वक्तव्यही करताना दिसत आहे. शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांनी म्हटले की, विरोधकांच्या मागे केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लावणे ही भाजपाची संस्कृती आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीत वाद होण्याची चिन्ह आहेत. (Maharashtra Politics BJPs culture to put central agencies behind the opposition Shinde group Attack gajanan kirtikar)

शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर हे आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. त्यांनी वक्तव्य केलं आहे की, विरोधकांच्या मागे केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लावणे ही भाजपाने आणलेली नवी संस्कृती आहे. अनुच्छेद 370 रद्द करणे, वस्तू सेवा कर, राम मंदिर उभारणी अशी चांगली कामे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहेत, पण त्यांच्यात आता एक प्रकारचा रुबाब आला आहे. त्यामुळे त्यांनी ‘400 पार’चा नारा देण्याऐवजी संसदच ताब्यात घ्यावी, पण मित्र पक्षांचाही मान राखावा, असा सल्ला गजानन कीर्तिकर यांनी दिला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Eknath Shinde : मुख्यमंत्री अडचणीत; इतिहासाची मोडतोड प्रकरणी कायदेशीर नोटीस

आमचा मान राखला गेला पाहिजे

गजानन कीर्तिकर म्हणाले की, माझे मुख्य नेते एकनाथ शिंदे आहेत. त्यांचे नेतृत्व आम्ही स्वीकारलेले आहे. त्यांना मी सांगितलं आहे की, आपल्याला वेसन बांधलेलं नाही आहे. आपलं स्वतंत्र अस्तित्व आहे. मोदींनी पंतप्रधान करायचं आहे आणि हे एकट्या भाजपाचं नाही तर आमचंही स्वप्न आहे. आमचीही व्होट बँक आहे आणि ही व्होट बँक बाळासाहेबांनी तयार केलेली आहे. हिंदुत्वाचा विचार, राष्ट्रीयत्वाचा विचार, आक्रमक शैली, मराठी माणसांचा उद्धार या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनेचे खेड्यापाड्यात कार्यकर्ते आहेत. त्यामुळे मी जाहीरपणे बोलतोय की, आमचा मान राखला गेला पाहिजे, अशा शब्दात गजानन कीर्तिकर यांनी भाजपावर घणाघात केला आहे.

- Advertisement -

आम्ही काही भाजपच्या दावणीला बांधलेलो नाही

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच महायुतीमधील संभाव्य जागावाटपाची आकडेवारी समोर आली होती. त्यानुसार भाजपला 32, शिवसेनेला 12 तर अजित पवार गटाला 4 जागा मिळण्याची शक्यता होती. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना गजानन कीर्तिकर यांनी आपली नाराजी बोलून दाखवली होती. आम्ही भाजपाच्या दावणीला बांधलेलो नाही. हे जागावाटप कुठून आले मला माहीत नाही, पण आमच्याशी यासंदर्भात कोणतीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे आम्हाला हे सूत्र मान्य नाही. 2019 मध्ये आम्ही 22 जागा लढलो होतो. तेव्हा आम्ही फक्त 4 ठिकाणी हरलो. त्यामुळे आता 12 जागा कशा घेणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.

हेही वाचा – Maharashtra Politics : भाजपासोबत जाण्याच्या दाव्यावर जयंत पाटील म्हणतात, शरद पवार तयार होते तर…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -