घरमुंबईमाळशेज घाट वाहतुकीसाठी खुला

माळशेज घाट वाहतुकीसाठी खुला

Subscribe

गेल्या चार दिवसापासून बंद असलेला माळशेज घाट अखेर वाहतूकीसाठी सुरु करण्यात आला आहे. २१ ऑगस्टला माळशेज घाटामध्ये दरड कोसळली होती. दरड हटवण्याचे काम पूर्ण झाले असून घाट वाहतूकीसाठी खुला करण्यात आला आहे.

दरड कोसळल्यामुळे २१ तारखेपासून बंद असलेला माळशेज घाट अखेर वाहतूकिसाठी खुला करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे माळशेज घाटामध्ये मोठी दरड कोसळली होती. खबरदारीच्या कारणास्तव या घाटातील दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आली होती. गेल्या चार दिवसापासून दरड हटवण्याचे काम सुरु होते. हे काम पूर्ण झाल्यानंतर हा घाट पुन्हा सुरु करण्यात आला आहे. दाट धुक आणि मुसळधार पाऊस यामुळे दरड हटवण्यात अडथळा निर्माण झाले होते. अखेर चार दिवसाच्या प्रयत्नांनंतर दरड हटवण्यात आली असून हा मार्ग पुन्हा वाहतूकीसाठी खुला करणयात आला.

पर्यटकांना माळशेज घाटात बंदी

निसर्गाचे स्वर्ग समजल्या जाणार्‍या माळशेज घाटात विकेंडमध्ये निर्सगाचा आनंद घेणाऱ्यांची संख्या मोठी असते मात्र घाटातील धोकादायक परिस्थिती असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पर्यटकांना माळशेज घाटात थांबण्यास मनाई करण्यात आली आहे. ३१ ऑगस्टपर्यंत माळशेज घाटातल्या सर्व धबधब्यांच्या एक किमी परिसरात प्रतिबंधात्मक आदेश महसुल विभागाकडुन देण्यात आले आहे.

पर्यटकांवर होणार कारवाई

खोल पाण्यात उतरणे, धबधब्याच्या ठिकाणी जाणे, धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे, वाहने वेगाने चालविणे, या परिसरात मद्यपान करून प्रवेश करणे, मोठमोठ्याने संगीत लावणे, महिलांची छेडछाड असे प्रकार झाल्यास कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

छत्री पाईंटजवळ कोसळली होती दरड

२१ ऑगस्टला माळशेज घाटातील छत्री पाईंटजवळ दरड कोसळली होती. एका ट्रकवर दरड कोसळल्याने ट्रक चालक जखमी झाला होता. अमोल दहिफळे असे या ट्रक चालकाचे नाव असून तो पाथर्डी येथील रहिवाशी होता. घटनेनंतर ट्रक चालकाला सुखरुप बाहेर काढून उपचारासाठी माऊली रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेनंतर माळशेज घाटातून कल्याण आणि इतर ठिकाणी जाणारी वाहतूक पुणे आणि नाशिकच्या दिशेने वळवण्यात आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -