घरमुंबईगृहराज्यमंत्र्यांच्या नावाचा वापर करून साडे नऊ लाखांचा गंडा

गृहराज्यमंत्र्यांच्या नावाचा वापर करून साडे नऊ लाखांचा गंडा

Subscribe

गृहराज्यमंत्री रणजितसिंह पाटील यांच्याशी ओळख असल्याचे सांगून फसवणूक केल्याचे प्रकार उघकीस आला आहे. या घटनेत फसवणाऱ्याने तब्बल लाखोंचा गंडा घातला आहे.

गृहराज्यमंत्री रणजितसिंह पाटील यांच्याशी ओळख असल्याचे सांगून, बिल्डरला शस्त्रपरवाना मिळवून देतो असे आमिष दाखवून साडेनऊ लाख रुपयांना लुबाडले असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी अतुल पेठे याला अटक केले आहे. आरोपी विरोधात यापूर्वी विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. अंबरनाथ येथे राहणाऱ्या उमेश पवार यांचे अंबरनाथ ( पूर्व ) येथील आनंदनगर एम आय डी सी परिसरात मटेरियल सप्लायचे दुकान आहे. पवार यांना खंडणीसाठी वारंवार गुंडांकडून फोन येत असल्याने त्यांनी अग्नीशस्त्र परवाना मिळावा म्हणून नोव्हेंबर २०१६ ला गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांच्या कार्यलयात अर्ज दाखल केला होता. त्यावेळी पवार यांच्या नातेवाईकांनी अतुलचे नाव सुचवले, तो एयर इंडिया मध्ये कार्यरत असल्याचे सांगून तुझे बंदुक परवान्याचे काम करून देईल असे सांगितले होते.

मंत्रालय परिसरात भेटून केली फसवणूक

पवार यांनी अतुल याच्याशी संपर्क साधला होता. त्यावेळी “तुमच्या बंदूक परवान्याच्या कामासाठी १२ ते १४ लाख रुपये लागतील. मात्र गृहराज्यमंत्री माझ्या परिचयाचे असल्याने तुमचे काम ६ लाखापर्यंत करून देतो.” असे आमिष पवारला दाखवले होते. अतुलला मंत्रालयात नोव्हेंबर २०१६ मध्ये पवारने ६ लाख रुपये दिले. त्यानंतर काही दिवसांनी पवार यांनी अतुलशी संपर्क करून बंदुक परवान्याच्या कामाबद्दल विचारणा केली असता आणखी तुम्हाला ३ लाख रुपये द्यावे लागतील असे सांगून त्यांच्याकडून २८ नोव्हेंबर २०१७ रोजी ३ लाख रुपये घेतले आणि नंतर पुन्हा ५० हजार रुपयांची मागणी केली . अशा प्रकारे तब्बल साडेनऊ लाख रुपये पवार यांनी त्याला दिले होते.

- Advertisement -

पोलिसांनी या कलमाअंतर्गत दाखल केला गुन्हा

दरम्यान, पवार यांनी गृहराज्यमंत्री यांच्या कार्यलयात जावून बंदुक परवाना बाबत दिलेल्या अर्जावर काय कार्यवाही झाली याबाबत विचारणा असता तुमचा अर्ज नामंजूर करण्यात आल्याचे सांगताच त्यांना धक्काच बसला. त्यानंतर त्यांनी अतुलच्या नौपाडा येथील घरीं जाऊन भेट घेतली व माझा अर्ज नामंजूर झाला असल्याचे सांगितले , साडे नऊ लाख देऊन सुद्धा माझे काम झाले नाही म्हणून माझे पैसे मला परत कर असे पवार यांनी अतुलला सांगितले , मात्र अतुलने पवार यांनाच उलट धमकी देवून तुलाच एखाद्या गुन्ह्यमध्ये फसवतो असे सांगून रक्कम देण्यास टाळाटाळ करीत होता. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे समजताच पवार यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून अतुल पेठे वर ४२०, ५०६ कलमाअन्वये गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या आधारे पोलिसांनी अतुला बेड्या ठोकल्या असून आज त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने अधिक पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -