घरमुंबईसरकारी मदतीच्या चेकवर अनेक चुका

सरकारी मदतीच्या चेकवर अनेक चुका

Subscribe

जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे पूर पिडित नागरिकांना महसूल विभागाने दिलेले चेक न वठताच परत आले आहेत.त्यामुळे घाईघाईने केलेल्या या मदतीबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे.

जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे पूर पिडित नागरिकांना महसूल विभागाने दिलेले चेक न वठताच परत आले आहेत.त्यामुळे घाईघाईने केलेल्या या मदतीबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे. यातील काही चेक्सवर 20/18/2018 अशी अजब तारीख टाकल्याचे आढळले आहे. त्यामुळे हे अवघ्या पाच हजार रुपयांचे चेकही परत आले आहेत.

नऊ ते बारा जुलै दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे वसई तालुका जलमय झाला होता. आठवडाभर परिसरात पाणी साचले होते. त्यामुळे टिव्ही, फ्रिज, फर्निचरसह अन्नधान्याचेही मोठे नुकसान झाले. शासनाच्या वतीने महसूल विभागाने या घरांचे पंचानामे केले. त्यामुळे नुकसानीची भरपाई मिळण्याच्या आशेवर नागरिक राहिले होते. मागील आठवड्यात त्यांच्या हातात मदतीचा चेकही पडला. मात्र त्यातील आकडा अजब होता. शासनाकडून त्यांना फक्त पाच हजार रुपयांची मदत देण्यात आली होती. तरीही बुडत्याला काडीचा आधार मानून पूरग्रस्तांनी हा चेक आपल्या खात्यात टाकला. त्यापैकी अनेकांचा चेक न वटताच परत आला.

- Advertisement -

शासनाने दिलेल्या चेक मध्ये असंख्य चुका असल्यामुळे तो न वठल्याचे निष्पन्न झाले आहे. काहींची नावे चेकवर चुकीची टाकण्यात आली आहेत. तर काहींच्या चेकवर चक्क 20/18/2018 अशी अजब तारीख टाकण्यात आली होती. त्यामुळे हे चेक वटले नाही. ते आता महसूल खात्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे. पूरग्रस्तांना तातडीची मदत कशी होईल यासाठी महसूल प्रशासनाने धावपळ केली. त्यात चेकवरील चुका झाल्या असतील, त्या लवकरच दुरुस्त करण्यात येतील आणि दुरुस्त झालेले चेक नागरिकांना दिले जातील. असे महसूल विभागाकडून सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -