घरमुंबईमराठा क्रांती मोर्चा; ठाण्यामध्ये आंदोलक आक्रमक

मराठा क्रांती मोर्चा; ठाण्यामध्ये आंदोलक आक्रमक

Subscribe

ठाण्यामध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. आंदोलकांनी टीएमटीच्या बसची तोडफोड केली. तर माजीवडा पुलावर टायर जाळले. ठाण्यामध्ये ठिकाठिकाणी आंदोलकांनी रस्त्यावर उतरुन जोरदार घोषणाबाजी केली आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन औरंगाबादमध्ये जलसमाधी आंदोलनादरम्यान काकासाहेब शिंदे या तरुणाने गोदावरी नदीमध्ये उडी मारली. त्याच्या मृत्यूनंतर आंदोलनाला हिंसक वळण आले. याच्या निषेधार्थ मंगळवारी मुंबई, पुणे, सातारा, सोलापूर वगळा राज्यभरामध्ये आंदोलन झाले. आज मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये मुंबई बंदची हाक देण्यात आली आहे. ठाण्यामध्ये सर्व रस्त्यावर सकाळपासून पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या मराठा आंदोलक रस्त्यावर उतरले असून त्यांनी बसची तोडफोड केली आहे.

Thane CM poster
ठाण्यात मुख्यमंत्र्यांचे पोस्टर फाडले

ठाण्यामध्ये मराठा आरक्षणावरुन आक्रम झालेल्या आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांचे बॅनर फाडले. भाजपकडून वचनपर्तीसंदर्भात तलावपाळी परिसरामध्ये बॅनर्स लावण्यात आले होते. संतप्त झालेल्या आंदोलकांनी हे बॅनर फाडले.

- Advertisement -

तीन हात नाकामध्ये रास्तारोको

ठाण्याच्या तीन हात नाक्यावर मराठा आंदोलकांनी मोठ्याप्रमाणात रस्त्यावर उतरुन जोरदार घोषणाबाजी केली आहे. या आंदोलनामध्ये महिला देखील सहभागी झाल्या आहेत.

- Advertisement -

वागळे इस्टेटमध्ये बसची तोडफोड

ठाण्याच्या वागळे इस्टेटमध्ये आक्रमक झालेल्या आंदोलकांनी टीएमटीची बसची तोडफोड केली आहे. बसच्या काचा आंदोलकांनी फोडल्या आहेत.

आंदोलकांनी दुकानं बंद करायला लावली

ण्यातील नौपाडा येथे गोखले रोडवर मराठा आंदोलकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलनाला सुरुवात केली. या आंदोलकांनी दुकानं बंद करण्यास लावली.

माजीवडा पुलावर टायर पेटवून दिले

तर ठाण्याच्या माजीवडा पुलावर संतप्त आंदोलकांनी घोषणाबाजी करत टायर पेटवून दिले. त्यामुळे या पुलावर वाहतूकीची कोंडी झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -