घरमुंबईMaratha Kranti Morcha LIVE Update: मुंबई-नवी मुंबईत अनेक ठिकाणी तणाव!

Maratha Kranti Morcha LIVE Update: मुंबई-नवी मुंबईत अनेक ठिकाणी तणाव!

Subscribe

आरक्षणावरून आक्रमक झालेल्या मराठा समाजाने आज मुंबई बंदची हाक होती. पण आता या आंदोलनात फूट पडली असून अनेक ठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.

मराठा आरक्षणासाठी बुधवारी सकाळपासूनच सकल मराठा समाज आणि इतर मराठा संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या. मंगळवारपासून राज्यभरात आंदोलन करत असलेल्या मराठा समाजाने बुधवारी मुंबई बंदची हाक दिली. सकाळपासूनच मुंबईच्या रस्त्यांवर मराठा समाजाचे बांधव जमा व्हायला सुरुवात झाली होती. सकाळीच पहिलं आंदोलन ठाणे स्टेशनला रेल रोको करून सुरू करण्यात आलं. त्यापाठोपाठ जोगेश्वरीमध्येही रेल रोको करण्यात आलं आणि पुढे हळू हळू मुंबईभर विविध ठिकाणी आंदोलकांनी मुंबई बंदच्या घोषणा देत मराठा आरक्षणाची मागणी जोरकस पद्धतीने केली. मुंबईमध्ये झालेल्या आंदोलनात अनुचित प्रकार फारसे घडले नसले, तरी नवी मुंबईत झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. कळंबोली, ठाणे आणि कोपर खैरणे परिसरात आंदोलकांनी पोलिसांनी दगडफेक केली. त्याला प्रत्युत्तरादाखल आंदोलकांना पांगवण्यासाठी गोळीबार आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. यामध्ये काही आंदोलनकर्ते आणि पोलिस कर्मचारीही जखमी झाले. दुपारच्या सुमारास मराठा क्रांची मोर्चा समितीचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी आंदोलन स्थगित केल्याची घोषणा केल्यानंतरही समाजातील काही गट आंदोलन सुरूच ठेवण्यावर ठाम होते.

संध्याकाळी ७.४० वा. – ठाण्यातून २० आंदोलकांना ताब्यात घेतले

- Advertisement -

संध्याकाळी ७.१५ वा. – वातावरण निवळण्यास सुरुवात

संध्याकाळी ५.३० वा.- आरक्षणाच्या मागणीसाठी पहिल्या मराठा आमदाराचा राजीनामा, शिवसेनेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दिला राजीनामा

- Advertisement -

संध्याकाळी ५.०५ वा.-: कळंबोलीमध्ये दगडफेक वरिष्ठ पोलीस निरीक्षक जखमी, कळंबोलीमध्ये एक्स्प्रेसवेवर तणाव

संध्याकाळी ४.४० वा.- अशोक चव्हाण यांची पत्रकार परीषद, मुंबईत मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन व्हावे, अशी मागणी

संध्याकाळी ४.०४ वा. – मराठा आंदोलनात फूट, ‘आंदोलन सुरुच राहणार’, मुंबई मराठा क्रांती मोर्चाचे समर्थक विनोद पोखरकर यांची माहिती

दुपारी २.३६ वा. – ठाणे, नवी मुंबईमध्ये शांतता राखण्याचे आवाहन

दुपारी २.३५ वा. – मुंबईतील मराठा समजाला शांततेचे आवाहन

दुपारी २.३४ वा. मुंबईतील मराठा आंदोलन स्थगित. मुंबईतील पत्रकार परिषदेमध्ये मुंबई समन्वयकांची घोषणा

दुपारी २.१५ वा. मुंबईत मराठा क्रांती मोर्चाच्या मुंबई समन्वयकांची पत्रकार परिषद

दुपारी १.४५ वा. – कळंबोली येथे आंदोलनाला हिंसक वळण. आंदोलनकर्त्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज

दुपारी १.४० वा. – घाटकोपरच्या जागृती नगर मेट्रो स्टेशन येथे मराठा मोर्चा पोहोचला

दुपारी १.४० वा. – मानखुर्द – वाशी दरम्यान आंदोलक रस्त्यावर

दुपारी १.३३ वा. – नवी मुंबईतील इंटरनेट सेवा बंद

दुपारी १.२५ वा. घाटकोपर पश्चिम येथे ठिय्या आंदोलन

दुपारी १.१५ वा. – मराठा क्रांती मोर्चा मुंबई समन्वयकांची दुपारी २ वाजता दादरच्या शिवाजी मंदिर येथे पत्रकार परिषद

दुपारी १.०० वा. – घाटकोपर गोपाळ भवन येथे दुकाने बंद करण्यात आली. महिलांचाही आंदोलनात सहभाग.

दुपारी १२.४५ वा. – आंदोलकांकडून परळ येथे चक्काजाम आंदोलन

दुपारी १२.१० वा. – नवी मुंबईतील कोपरखैराणे येथे अजित पवारांचा बॅनर फाडला

दुपारी १२.०० वा. – बोरिवली येथे पश्चिम द्रुतगती महामार्ग रोखून धरला

सकाळी ११.५० वा. – चांदिवली, गोराई, कोपरखैराणे येथे ३ बसगाड्यांच्या टायरची हवी काढली. तर ९ बस गाड्यांचे केले नुकसान

सकाळी ११.४५ वा. – घाटकोपर येथे कार्यकर्त्यांनी दुकाने केली बंद

सकाळी ११.४० वा. – माध्यमांना आंदोलकांनी हटकले

सकाळी ११.३५ वा. – घाटकोपरच्या पंथनगर येथे आंदोलकांनी रूग्णवाहिकेला जागा करून दिली

सकाळी – ११.३० वा. – अंधेरी, विलेपार्ले परिसरामध्ये मराठा आंदोलक आक्रमक. दुकाने आणि गाळे बंद पाडण्याचा प्रयत्न

सकाळी ११.२५ वा. – दादरमध्ये कडकडीत बंद

सकाळी ११.२० वा. – घाटकोपरच्या लक्ष्मी नगर येथे आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी

सकाळी ११.१५ वा. – ठाण्यात आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांचा बॅनर फाडला
सकाळी – ११.०२ वा. – कल्याणच्या शिवाजी चौकामध्ये आंदोलकांची मोठी गर्दी

सकाळी ११ वा. श्रेयस सिनेमा येथे मराठा आंदोलकांचे मुंडन आंदोलन

सकाळी १०. ५७ वा. – बोरिवलीतील गोराई येथून सुरू झालेले मराठा आंदोलन कांदिवली येथील मेट्रो स्टेशनजवळ पोहोचले. आंदोलकांचा रस्त्यावर ठिय्या

सकाळी १०. ५५ वा. – दादर प्लाझा येथून आंदोलक वरळीच्या दिशेने रवाना

सकाळी १०.५३ वा. – घाटकोपर श्रेयस सिग्नल येथे आंदोलकांकडून घोषणाबाजी, वाहतुकीवर कोणताही परिणाम नाही

सकाळी १०.५० वा. – आंदोलकांनी पश्चिम द्रुतगती महामार्ग केला बंद

सकाळी १०.४९ वा. – मराठा आंदोलकांकडून मेट्रोचे जागृती नगर स्टेशन बंद करण्याचा प्रयत्न. एक मराठा लाख मराठाच्या घोषणा
सकाळी १०.३८ वा. – घणसोली येथे मराठा आंदोलकांचे रेल रोको

सकाळी १०.३७ वा. – दादर प्लाझा परिसरामध्ये आंदोलकांचा रास्तारोको

सकाळी १०.३५ वा. – दहिसरमध्ये काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

सकाळी १०. ३० वा. – बोरिवली पूर्व-पश्चिम भागातील दूध डेअरी आणि मेडिकल वगळता दुकाने बंद, बंदला बोरिवलीमध्ये संमिश्र प्रतिसाद, पोलिसांचा कडक बंदोबस्त

१०.१७ वा- दादरमध्ये मराठा मोर्चा दाखल, आंदोलकाचे ठिय्या आंदोलन, गाड्या अडवल्या

सकाळी १०.१५ वा. – बोरिवलीमध्ये आंदोलकांनी सर्व दुकाने बंद केली

सकाळी १०.१५ वा – ठाण्यामध्ये आंदोलकांचा रेल रोको

सकाळी १०.१० वा. – घाटकोपर – मानखुर्द रोडवरून वाशीच्या दिशेने जाणारी वाहतुक सुरू, मात्र सायन – पनवेल हायवे बंद

सकाळी १०.०० वा. – दादर परिसरातील दुकाने बंद

सकाळी ८.१५ वा. – ठाण्यातील तीन हात नाका येथे देखील आंदोलकांनी बस फोडली. आक्रमक झालेल्या आंदोलनकांनी सायन – पनवेल मार्गावर रस्तारोको करण्यात आला.

नालासोपाऱ्यामध्ये दुकान बंद न करणाऱ्याला मारहाण करण्यात आली. दरम्यान आंदोलन शांततेमध्ये पार पाडावे असे आवाहन मराठा समन्वय समितीककडून करण्यात आले आहे.

jogeshwari rail roko
जोगेश्वरीमध्ये आक्रमक झालेल्या मराठा आंदोलकांनी चर्चगेटकडे जाणारी फास्ट लोकल रोखली. त्यामुळे रेल्वे वाहतूकीवर परिणाम झाल्याचे  पाहायाला मिळत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -