घरमुंबईप्रशांत दामले करायला गेला एक आणि झाले भलतेच !

प्रशांत दामले करायला गेला एक आणि झाले भलतेच !

Subscribe

इंधन दरवाढीविरोधात केंद्र सरकारवर टीकेची झोड उठली असतानाच सलग चौदाव्या दिवशीही पेट्रोल-डिझेल महाग होत आहेत. विविध देशांतील पेट्रोलच्या दरांविषयी माहिती टाकणारी पोस्ट केल्यामुळे प्रसिद्ध अभिनेता प्रशांत दामले सोशल मीडियावर ट्रोल झाला.

पोट्रोल दरवाढीचा भडका
प्रशांत दामले याने शुक्रवारी मध्यरात्री 12 वाजून 23 मिनिटांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकली. ’आज हाँगकाँगमध्ये पेट्रोलची किंमत आहे 144 रुपये प्रतिलीटर, चीनमध्ये तीच 81 रुपये आहे, तर सिंगापूरमध्ये 110 रुपये इतकी आहे.’ असे दामलेंनी लिहिले होते. प्रशांत दामले नरेंद्र मोदी समर्थक असून पेट्रोल दरवाढीचे समर्थन करत आहेत, असा समज करुन सोशल मीडिया यूझर्सनी त्याला चांगलंच फैलावर घेतले.

- Advertisement -

मोदीभक्त असल्याचा मारला शिक्का
कोणी सिंगापूर, चीन अशा देशांमधील जीवनमान भारताच्या तुलनेत कसे उच्च आहे, तिथले चलन आणि त्या देशांच्या नागरिकांना महाग पेट्रोलचे दर कसे सहज परवडतात, हे सांगितले. तर कुणी त्याच्या कपाळावर मोदीभक्त असल्याचा शिक्का मारला. कोणी समजवले, कोणी त्याची कीव केली, कोणी खिल्ली उडवली, तरी कोणी जहाल शब्दात गरळही ओकली.

दामलेंनी दिले प्रत्युत्तर
प्रशांत दामलेने रविवारी दुपारी पुन्हा एक पोस्ट टाकली. ’एक सामान्य माणूस म्हणून मला काही सत्य गोष्टी कळतील अशी अपेक्षा होती, पण झाले भलतेच… काही अभ्यासपूर्ण कमेंट वगळता वैयक्तिक टीका आणि उपहासात्मक उत्तरे ऐकायला मिळाली’, अशी खंत त्याने व्यक्त केली. मी नमोभक्तही नाही आणि काँग्रेस भक्तही नाही. गेली 35 वर्षे माझा 80 टक्के प्रवास हा रस्तेमार्गेच होतो. त्यामुळे डिझेल आणि पेट्रोलच्या संदर्भात सत्य जाणून घेऊया असे मनात होते. आता मी माझ्या पद्धतीने माहिती मिळवीन, असे दामलेने स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -