घरमहाराष्ट्रत्रास होतोय, पण समाधान वाटतंय - ललित साळवे

त्रास होतोय, पण समाधान वाटतंय – ललित साळवे

Subscribe

बीड जिल्ह्यातील राजेगावमध्ये राहणाऱ्या ललिता साळवेचा अखेर ललित होण्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. लिंग परिवर्तनाच्या झालेल्या शस्त्रक्रियेमुळे त्रास होतोय पण, मनाने फार समाधान वाटतंय अशी प्रतिक्रिया स्वत: ललित साळवे यांनी दिलीय. एकीकडे आपण मुलगा होण्याच्या वाटेवर आहोत याचं समाधान ललितच्या चेहर्यावर आहे. पण, दुसरीकडे एवढी मोठी शस्त्रक्रिया आपल्या मुलावर झाली याचं दुःख मात्र ललितची आई केशराबाई साळवे यांना सहन होत नाही. आपल्या मुलाला प्रचंड वेदना होत असल्याचं आई केशरबाई सांगतात.

त्याचं दुखणं ही बघवत नाही – ललितची आई
ललिता मुलगा आहे हे आम्हाला तो ४ – ५ वर्षांचा असतानाच अंदाज आला होता. पण, त्यानंतर तो शिक्षणासाठी मामाकडे राहायला लागला. शिवाय, आमची परिस्थिती नसल्याकारणाने आम्ही त्याच्यासाठी काही करू शकलो नाही. जास्त घरी येत नसल्यामुळे मासिक पाळी, किंवा मुलींमध्ये जे बदल होतात याविषयी बोलणंच नाही झालं. आम्ही त्याच्यासाठी त्यावेळेस काहीच करु शकलो नाही. त्याचं दुःख तर आहेच. त्याचं दुखणं ही बघवत नाही, अशा भावना केशरबाई यांनी व्यक्त केल्या आहेत. ललितला २ भाऊ आणि एक बहिण आहे. त्या तिघांचं ही लग्न झालं आहे. ललित सोबत आता त्याची आई, काका आणि लहान भाऊ आहे.

- Advertisement -

-भरत बनसोडे, ललितचे काका
हे सर्व माहित पडलं तेव्हा धक्का बसला. त्याची शस्त्रक्रिया होणार आहे हे माहित झाल्यावर आम्ही इथे आलो. त्याची आई सध्या मानसिक धक्क्यातून सावरली नाही आहे. पण, आता त्याला आम्ही ललितच म्हणणार.

ललित सध्या डाएटवर
ललितवर सध्या सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आणखी काही दिवस ललितवर रुग्णालयातच उपचार सुरू राहणार आहेत. त्याला सध्या डाएटवर ठेवण्यात आलं आहे. कारण, जर त्याचं खाणं अति झालं आणि त्याने बेडवरच नैसर्गिक विधी केल्या तर त्याचं त्याला इन्फेक्शन होऊ शकतं, असं डॉ. मणिकानंद यांनी सांगितलं आहे.

- Advertisement -

पूर्णपणे मुलगा होण्यासाठी १ ते दिड वर्ष
बीड जिल्ह्यातील पोलिस कॉन्स्टेबल ललिता साळवे यांची अखेर लिंग परिवर्तनाची पहिली शस्त्रक्रिया शुक्रवारी झाली. त्यानंतर आता त्याला पूर्णपणे मुलगा होण्यासाठी १ ते दिड वर्ष जाणार असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे.

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -