घरमुंबईखेकड्याचे निळे रक्त विकण्याचे आमिष दाखवून फसवणूक

खेकड्याचे निळे रक्त विकण्याचे आमिष दाखवून फसवणूक

Subscribe

कल्याणात फसवणुकीचे इंटरनेट उघड

ईमेल आणि फेसबुकद्वारे पैशांचे आमिष दाखवून गंडा घालण्याच्या घटनांत वाढ होत असतानाच युकेतील औषध कंपनीला खेकड्याचे निळे रक्त पाठवून नफा कमावण्याचे आमिष दाखवून सुमारे ३ लाख ३६ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी अब्दुल कादिर इब्राहिम कच्छी (४०) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता २९ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. इंटरनेटवरून फसवणूक करणाèयांची ही एक आंतरराष्ट्रीय टोळी सक्रिय असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
उल्हासनगर येथे राहणारे फिर्यादी निनाद सारीपुत्र तेलगोटे यांना ई-मेलवर संपर्क साधून पैसे कमविण्याचे आमिष दाखविले गेले. त्यासाठी वेळोवेळी पैसे बँकेत ट्रान्सफर करण्यास सांगून ३ लाख ३६ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास गुन्हे शाखा युनिट -१ च्या पथकाने शोध घेत पनवेल नवी मुंबई येथे राहणाऱ्या अब्दुल कादिर इब्राहिम कच्छी याला अटक केली आहे. अशा प्रकारे आमिष दाखवून गंडा घालणारी आंतरराष्ट्रीय टोळी सक्रिय असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. जानेवारी २०१८ मध्ये कासारवडवली पोलीस ठाण्यात कच्छी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर त्यात अटकही करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. शनिवारी अब्दुल कच्छी याला न्यायालयाने २९ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -