घरमुंबईभय 'गणिता'चे संपत नाही!

भय ‘गणिता’चे संपत नाही!

Subscribe

शालेय अवस्थेपासून मुलांमध्ये दहशत निर्माण करणारे दुसरे-तिसरे कोणीही नसून गणित हा विषय आहे. आकडेमोडीपासून, आलेखापर्यंत गणिताच्या प्रत्येक गोष्टी मुलांना भयभीत करतात, असे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे. असे असले तरी काही मुलांना मात्र गणिताची आवड लहानपणापासूनच असते. त्यांच्यासाठी गणित हा विषय स्कोअरिंग असतो.

नुकताच दहावीचा निकाल लागला. त्यात गणित विषयात जेमतेम गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे आढळून आले आहे. मात्र भाषा विषयात या विद्यार्थ्यांचा चांगले गुण मिळाले आहेत. या मुलांचे एक सर्वेक्षण केले असता लहानपणापासून त्यांना गणित विषयाची भीती वाटत असल्याचे उघडकीस आले आहे. परीक्षेच्यावेळी गणिताचा विशेष अभ्यास केला. मात्र तरीही गणिताची भीती काही कमी झाली नाही, असा दावा या विद्यार्थ्यांनी केला आहे.

- Advertisement -

गणित विषयाचा दबाव आणि त्यात कमी गुण मिळण्याच्या भीतीमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांनी क्लासेसला घातले. क्लासेस्मध्येही गणित विषयाची विशेष तयारी करून घेण्यात आली. मात्र तरीही त्यात विशेष गुण मिळाले नाहीत, त्याचे दु:ख या विद्यार्थ्यांना आहे. मात्र त्याचवेळी गणित विषयात पास झालो, कुठेही गडबड झाली नाही, याचा आनंदही त्यांना आहे.

या विद्यार्थ्यांच्या पालकांनाही गणित विषय आपल्या पाल्याला अवघड जातो याची कल्पना आहे. सर्वेक्षणानुसार गणित विषयात आपला पाल्य फारशी चांगली कामगिरी करू शकणार नाही, याची कल्पना पालकांना आहे. हे सर्वेक्षण क्लूमॅथ्स या आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने गणित शिकवणाऱ्या संस्थेने केले आहे.

- Advertisement -

सर्वे काय म्हणतो?
सुमारे ८९ टक्के पालकांना आपल्या पाल्याला गणित विषय अवघड जात असल्याचे वाटते. त्यातील ७७ टक्के पालकांचे मत आहे की, गणित हा विषय शाळेत योग्यप्रकारे शिकवला जात नाही. आपल्या पाल्याला गणितात चांगली गती असावी, असे प्रत्येक पालकांना वाटते. आपल्याला गणित चांगले यावे, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांचीही आहे. गणित विषयानंतर पालक आणि विद्यार्थी विज्ञान विषयाला प्राधान्य देतात.

ज्या विद्यार्थ्यांना गणितात चांगले गुण मिळतात त्यांच्याविषयी इतर विद्यार्थ्यांमध्ये कटुता असते. तसेच गणितात चांगले गुण मिळवणाèया पाल्याबद्दल त्यांच्या पालकांना अभिमान असतो, असे सर्वेक्षणात आढळून आले आहे.
पाल्याच्या गणित विषयाच्या परीक्षेआधी प्रचंड ताण येत असल्याचे सुमारे ६३ टक्के पालकांनी मान्य केले आहे. तर सुमारे ९० टक्के विद्यार्थी गणित विषयाच्या परीक्षेआधी तणावात असल्याचे आढळून आले आहे.

गणित विषयाची आवड ही उपजतच असते असे नाही. अनेक विद्यार्थ्यांनी या विषयात रस घेऊन आवड निर्माण केली असे मी पाहिले आहे. हा विषय सोपा जावा की अवघड हे विद्यार्थ्यानेच ठरवायचे असते. तो सोपा जावा असे वाटत असेल तर त्याला घाबरून नव्हे तर त्याच्याशी मैत्री करून त्याच्या जवळ जायला हवे. एकदा का गणिताची आवड निर्माण झाली की, याच्यासारखा स्कोअरिंग विषय नाही.
मनोहर अवस्थी
निवृत्त शिक्षक, सीबीएसई बोर्ड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -