घरमुंबईगोरेगाव जंगल आग प्रकरण : उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

गोरेगाव जंगल आग प्रकरण : उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

Subscribe

अग्निशमन दलाच्या १०० जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन मध्यरात्री साडेबारा वाजता म्हणजे तब्बल सहा तासांनी ही आग विझवली. या आग प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत,

गोरेगावच्या आरे कॉलनीमधील जंगलात लागलेली आग तब्बल सहा तासानंतर अटोक्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन आगीवर नियंत्रण मिळवले. आरे कॉलनीतील अरुण कुमार वैद्या मार्गाजवळील इन्फीनिटी आयटी पार्कच्या जंगलात सोमवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास भीषण आग लागली. मोठ मोठी झाडं या आगीमध्ये जळून खाक झाली आहे. जवळपास ३ ते ४ किलोमीटरच्या परिसरातील झाडे या आगीत जळून खाक झाली आहेत. आग ऐवढी भीषण होती की, या परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतेचे वातावरण होते. आग भडकत चालल्यामुळे याठिकाणी राहणाऱ्या आदिवसी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते. या आगीमध्ये वनसंपदेचे मोठे नुकसान झाले आहे.

- Advertisement -

सहा तासानंतर आग विझली

जंगल आणि घनदाट झाडी असल्यामुळे या परिसरामध्ये अग्निशमन दलाच्या गाड्या पोहचू शकत नव्हत्या. शेवटी अग्निशमन दलाच्या जवानांनी पायी चालत आग विझवण्याचा प्रयत्न केला. आग विझवणे हे अग्निशमन दलाच्या पुढे मोठे आव्हान होते. कारण वणवा पेटल्यामुळे उष्णता आणि आग लागल्याच्या ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या पोहचू शकत नसल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना अडथळे येत होते. अखेर अग्निशमन दलाच्या १०० जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन मध्यरात्री साडेबारा वाजता म्हणजे तब्बल सहा तासांनी ही आग विझवली.

उच्चस्तरीय चौकशी होणार

दरम्यान, जमीन हडपण्यासाठी ही आग जाणूनूबुजून लावली असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या आगीच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले असल्याचे सहाय्याक मनपा आयुक्त संजोग कबरे यांनी सांगितले आहे. यामध्ये कोणी दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -