घरमुंबईरविवारी तिनही मार्गांवर मेगाब्लॉक

रविवारी तिनही मार्गांवर मेगाब्लॉक

Subscribe

पश्चिम, मध्य आणि हार्बर या तिनही रेल्वे मार्गांवर २४ जून रोजी मेगाब्लॉग ठेवण्यात आला आहे. उपनगरीय रेल्वेच्या देखभाल आणि दुरुस्तीची कामं या रविवार करण्यात येणार आहेत. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांचे मेगाहाल होण्याची शक्यता आहे.

मुंबईतील पश्चिम, मध्य आणि हार्बर या तिनही रेल्वे मार्गांवर रविवारी २४ जून मेगाब्लॉग ठेवण्यात आला आहे. उपनगरीय रेल्वेच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला असून पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरील दुरुस्तीची कामे देखील करण्यात येणार आहेत. त्यामुळे मुंबईच्या तिनही रेल्वे मार्गावर प्रवाशांचे ‘मेगा’ हाल होणार आहेत. मध्य रेल्वेवरील मुलुंड ते माटुंगा दरम्यान अप धिम्या मार्गवर सकाळी ११.१० ते ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. ब्लॉक दरम्यान अप धिम्या मार्गावरील वाहतूक अप जलद मार्गावरून चालवण्यात येणार आहेत. तर, हार्बर मार्गावर कुर्ला-वाशी दरम्यान अप डाउन मार्गावर सकाळी ११.१० ते ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी – कुर्ला आणि वाशी – पनवेल दरम्यान स्पेशल ट्रेन चालवण्यात येणार आहे.

शनिवारी रात्री स्पेशल ब्लॉक

मध्य रेल्वे मार्गावरील घाटकोपर स्थानकांत नवीन पादचारी पुलाचे काम सुरु असल्यामुळे पुलाचा गर्डर टाकण्यासाठी शनिवारी रात्री घाटकोपर स्थानकांत स्पेशल ब्लॉक घेण्यात येणार आहे. अप आणि डाउन मार्गावर रात्री १२.१५ ते सकाळी ६.१५ या वेळेत गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. शनिवारी रात्री ११.३० वाजल्यापासून सीएसएमटी स्थानकातून डाउन धिम्या मार्गावर सुटणाऱ्या गाड्या रविवारी पहाटे ५.२८ वाजेपर्यंत माटुंगा ते मुलुंड दरम्यान डाउन जलद मार्गावरून वळवण्यात येणार आहेत. तसेच, ठाण्याहून रात्री ११.४९ नंतर अप धिम्या मार्गावरून सुटणाऱ्या सर्व लोकल रविवारी सकाळी ६.०८ वाजेपर्यत मुलुंड ते माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावरुन चालवण्यात येणार आहेत. परिणामी या गाड्या विद्याविहार, कांजुरमार्ग आणि नाहूर स्थानकात थांबणार नाहीत. याशिवाय अप आणि डाउन मार्गावरील सर्व मेल-एक्सप्रेस गाड्या ब्लॉक काळामध्ये २५ ते ३० मिनिटे उशिराने धावणार आहेत.

- Advertisement -

पश्चिम रेल्वेचा जम्बोब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरीवली ते गोरेगाव स्थानकांदरम्यान अप डाउन या धिम्या मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकदरम्यान या मार्गावरील वाहतूक अप डाउन जलद मार्गावरुन चालवण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान काही लोकल गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -