घरलाईफस्टाईलपोटदुखी दूर करतील 'हे' पदार्थ

पोटदुखी दूर करतील ‘हे’ पदार्थ

Subscribe

पावसाळा म्हटलं की पोट दुखीचा त्रास हमखास उद्भवतो. तुम्हीही पोटदुखीमुळे त्रस्त असाल, तर हे ५ पदार्थ तुम्हाला नक्कीच आराम मिळवून देतील.

पावसाळा जसा नवचैतन्य घेऊन येतो तसंच अनेक आजारांनाही सोबत घेऊन येतो. पावसाळ्यात विविध आजार, इन्फेक्शन्स डोकं वर काढतात. या दिवसांत खाण्या-पिण्याची काळजी न घेतल्यास किंवा बाहेरचे पदार्थ जास्त खाल्ल्यास पोटाचे विकार हमखास उद्भवतात. मात्र, काळजी करु नका. तुम्हाला पोटदुखीचा त्रास होत असेल तर हे काही पदार्थ तुम्हाला नक्कीच आराम मिळवून देतील.

१. हळद – पोटादुखी होत असल्यास एक चमचा हळद पावडर मधामध्ये मिसळून त्याचं सेवन करा. २-३ दिवस नियमितपणे याचं सेवन केल्यास तुम्हाला नक्की आराम  मिळेल.

- Advertisement -

२. लवंग – लवंग शरीरातील बॅक्टेरिया संपविण्याचे काम करतो. लवंगातील औषधी गुणधर्म पोटातील जंतू मारुन पोटदुखी बरी करतात.

- Advertisement -

३. लसूण – रोज सकाळी २-३ लसूणच्या पाकळ्यांचे नियमित सेवन केल्यास पोटदुखी तसंच अन्य विकारांपासून दूर राहण्यास मदत होते.

४. हिंग – उपाशीपोटी हिंग खाण्याचे खूप फायदे असतात. मुख्यत्वे करुन हिंगाच्या नियमित सेवनामुळे गॅसेस आणि पोटदुखीची समस्या दूर होते.

 

५. आलं – आल्याचा एक छोटा तुकडा खाल्याने पोटाचे विकार दूर होतात. आल्यासोबत काळी मिरी घेतल्यास अधिक उत्तम.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -