घरट्रेंडिंगआलोक नाथ यांचा विनता नंदाविरोधात मानहानीचा दावा

आलोक नाथ यांचा विनता नंदाविरोधात मानहानीचा दावा

Subscribe

‘संस्कारी बापूजी’ म्हणून ओळख असलेले अभिनेते आलोक नाथ यांच्यावर विनताने आरोप केल्यानंतर आलोक नाथ यांनी कायद्याचा आधार घेतला आहे. याप्रकरणामुळे मानहानी झाल्याचं म्हणत आलोक नाथ यांनी विनता नंदाविरोधात न्यायालयामध्ये मानहानीचा दावा करवा अशी मागणी केली आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीतील एकेकाळच्या प्रसिद्ध मालिका ‘तारा’ च्या लेखिका विनता नंदा यांनी ‘संस्कारी बापूजी’ म्हणून ओळख असलेले अभिनेते आलोक नाथ यांच्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक – निर्मात्या विनता नंदा यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आलोक नाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. मात्र आता विनताच्या आरोपानंतर आलोक नाथ यांनी कायद्याचा आधार घेत विनता नंदा यांच्याविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. विनता नंदा यांच्या पोस्टनंतर काही अभिनेत्री आणि महिलांनी देखील आलोक नाथ यांच्यावर गैरवर्तवणुकीचे आरोप केले आहेत. याप्रकरणामुळे मानहानी झाल्याचं म्हणत आलोक नाथ यांनी विनता नंदाविरोधात न्यायालयामध्ये मानहानीचा दावा दाखल करण्याची मागणी केली आहे.

या महिलांनी केले आरोप

विनता नंदा यांनी लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर ‘हम साथ साथ है’ चित्रपटाची क्रू मेंबर, अभिनेत्री संध्या मृदुल, नवनीत निशान यांनीसुद्धा आलोक नाथ यांच्यावर आरोप केले आहेत. दरम्यान आलोक नाथ यांनी तक्रार दाखल करत त्यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करण्याची आलोक नाथ यांनी मागणी केली आहे.

- Advertisement -

‘त्या’ पार्टीनंतर झाले अत्याचार

आलोक नाथ यांनी एक दिवस त्यांच्या घरी पार्टी ठेवली होती. याआधीही अनेकदा मित्रांसोबत अशा प्रकारे पार्टी केल्यामुळे नंदाही तिथे गेल्या. पण त्यांच्या ड्रिंकमध्ये काहीतरी मिसळल्यासारखे त्यांना वाटले. ड्रिंक घेतल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटायला लागले. रात्री २ वाजता जेव्हा त्या घरी जायला निघाल्या, तेव्हा त्यांना कुणीही सोडायला आले नाही. अखेर त्या एकट्याच चालत घराकडे निघाल्या. पण तेव्हाच आलोक नाथ गाडी घेऊन तिथे आले आणि ‘घरी सोडतो’ असे सांगत विनता यांना गाडीत बसवले. पण तेव्हाच त्यांची शुद्ध हरपली. पुढे फक्त त्यांना जबरदस्तीने दारू पाजली जात असल्याचे आठवत होते. दुसर्‍या दिवशी मात्र शरीर दुखत होते. त्या रात्री मला मारहाण करून माझ्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले होते, असेही नंदा यांनी सांगितले.

- Advertisement -

वाचा – आरोपानंतर आलोकनाथ धक्क्यात

वाचा – #Me Too चे गौप्यस्फोट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -