घरमुंबईमेट्रो पासधारकांना कॅशबॅक ऑफर

मेट्रो पासधारकांना कॅशबॅक ऑफर

Subscribe

मेट्रो १ मार्गावर प्रवास करणाऱ्या पासधारकांना २ टक्के  ते १० टक्के मिळणार कॅशबॅक ऑफर

घाटकोपर अंधेरी वर्सोवा या मेट्रो १ मार्गावर प्रवास करणाऱ्या पासधारकांना २ टक्के  ते १० टक्के इतका कॅशबॅक देण्याची घोषणा मुंबई मेट्रो वन कडून करण्यात आली आहे. येत्या १ फेब्रुवारीपासून ही कॅशबॅकची सवलत प्रवाशांसाठी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई मेट्रोच्या एकूण प्रवाशांपैकी एक तृतीयांश प्रवासी हे पासधारक आहेत. तसेच गेल्या वर्षभरात पासधारकांच्या संख्येत ५१ टक्के इतकी वाढ झाली आहे. प्रवासासाठीच्या तिकीट घेण्यासाठीच्या रांगा कमी होणे या सवलतीच्या माध्यमातून मेट्रो वनला अपेक्षित आहे. किमान २०० रूपये ते ६०० रूपये असा रिचार्ज केल्यास ही सवलत मिळेल.

का देण्यात आली ऑफर

घाटकोपर अंधेरी वर्सोवा या मेट्रो १ मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. तसेच या मार्गावर मोठ्या संख्येने प्रवासी तिकिटांच्या रांगेत उभे असतात. मात्र पासाची ऑफर दिल्यामुळे दररोज तिकीट काढणाऱ्यांची संख्या कमी होऊन ते प्रवासी पास काढतील. या अपेक्षने मेट्रो पासधारकांना कॅशबॅकची ऑफऱ देणायात आली आहे.

- Advertisement -

असा मिळेल कॅशबॅक

२०० रुपये पासावर – २ टक्के सवलत
३०० रुपये पासावर – ४ टक्के सवलत
४०० रुपये पासावर – ६ टक्के सवलत
५०० रुपये पासावर – ८ टक्के सवलत
६०० रुपये पासावर – १०० टक्के सवलत


वाचा – ‘मुंबई मेट्रो’वरुन काँग्रेसचा थयथयाट का? – आशिष शेलार

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -