घरमुंबईम्हाडाची लॉटरी मोबाईलवर लाईव्ह वेबकास्टिंगद्वारे पहायला अर्जदारांनी दिली पसंती

म्हाडाची लॉटरी मोबाईलवर लाईव्ह वेबकास्टिंगद्वारे पहायला अर्जदारांनी दिली पसंती

Subscribe

म्हाडाच्या सोडतीला अर्जदारांनी प्रत्यक्ष हजेरी लावली नाही. म्हाडाच्या लॉटरीसाठी ५५ हजार अर्ज आले होते मात्र प्रत्यक्ष लॉटरी पाहण्यासाठी ५०० अर्जदारसुध्दा आले नसल्याचे समोर आले आहे. प्रत्यक्ष हजेरी लावण्यापेक्षा मोबाईलवर लाईव्ह वेबकास्टिंग पाहण्यासाठी अर्जकर्त्यांनी यंदा पसंती दिली आहे.

आपल्या हक्कांच्या घराचे स्वप्न पुर्ण होणार की नाही याची उत्सुकता आता मोबाईलवर येऊन थांबली आहे. म्हाडाच्या सोडतीला प्रत्यक्ष हजेरी लावण्यापेक्षा मोबाईलवर लाईव्ह वेबकास्टिंग पाहण्यासाठी अर्जकर्त्यांनी यंदा पसंती दिली आहे. जगभरातील २५ देशांमधून २५ हजार ग्राहकांनी म्हाडाच्या लॉटरीची सोडत आज ऑनलाईनच पाहिली. म्हाडाने लॉटरीसाठी हजेरी लावणाऱ्यांच्या संख्येतील अपेक्षित केलेली घट आजच्या सोडतीच्या निमित्ताने रिकाम्या खुर्च्यांच्या माध्यमातून दिसून आली. म्हाडाच्या या निर्णयामुळे ६० लाख रूपयांच्या खर्चात बतच करण म्हाडाला शक्य झाले आहे.

परदेशात म्हाडाची लॉटरी पाहिली गेली

भारत, सौदी अरेबिया, अमेरिका, सिंगापुर, युएई, इंग्लंड, केनिया, केनिया, नेपाळ, कॅनडा, जर्मनी, डेन्मार्क, कुवैत, मलेशिया, ओमान, कतार, ऑस्ट्रेलिया, बोस्टवाना, चीन, इस्राईल, जपान, न्यूझीलॅंड, पेरू, साऊथ आफ्रिका यासारख्या देशात आजची म्हाडाची लॉटरी पाहिली गेली. २०१२ सालापासून म्हाडाने ऑनलाईन वेबकास्टिंगचा पर्याय ग्राहकांना दिला. त्यामुळेच लॉटरीच्या ठिकाणी उपस्थित राहून प्रत्यक्ष लॉटरी पद्धत पाहण्याची मेहनत आता अर्जकर्ते घेत नाहीत. लॉटरीच्या सॉफ्टव्हेअर आणि एकूणच लॉटरी प्रक्रियेच्या प्रणालीवर अर्जकर्त्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच ऑनलाईन लॉटरी पाहणाऱ्यांच्या संख्येत वर्षनिहाय वाढ झालेली आहे.

- Advertisement -

लॉटरी प्रक्रिया पूर्णपणे बदलली

आज घोषित करण्यात आलेल्या म्हाडा कोकण मंडळाच्या ९००० घरांच्या लॉटरीसाठी ५५ हजार अर्ज आले. पण प्रत्यक्षात लॉटरी पाहण्यासाठी म्हाडा मुख्यालयात ५०० लोकही नव्हते हे विशेष. याआधीच्या लॉटरीमध्ये एकेकाळी तीन किलोमीटरच्या रांगा लागल्याचे म्हाडाचे अधिकारी सांगतात. प्रसंगी मनुष्यबळाचा वापर करून गर्दीला आवर घालावा लागल्याची आठवण म्हाडाच्या अधिकाऱ्याने सांगितली. १९८० च्या दशकात तर म्हाडाची लॉटरी प्रक्रिया ही दोन दिवस चालल्याची माहिती आहे. त्यावेळी चिठ्ठ्या काढून सोडत काढण्यात आली. पण आता परिस्थिती पुर्णपणे बदलली आहे. ऑनलाईन वेबकास्टिंगच्या माध्यमातून लॉटरी घरबसल्या पाहता तर येतेच, पण लॉटीरीच्या निकालाची यादी सायंकाळी ६ वाजता म्हाडाच्या संकेतस्थळावर दिसते. त्यामुळेच अर्जकर्त्यांची पहिल्यासारखी लॉटरी प्रक्रियेबाबतची नाहक चिंता आता दूर झाली आहे. मोबाईलवर वेबकास्टिंग पाहण सहज शक्य झाल्यानेच आता प्रत्यक्ष लॉटरीच्या ठिकाणी हजेरी कमी झाली आहे.

मोबाईलवर लाईव्ह वेबकास्टिंगला जास्त पसंती

गेल्या काही वर्षात लॉटरीसाठी हजेरी लावणाऱ्यांची घटलेली संख्या पाहता म्हाडाने अनेक वर्षानंतर म्हाडा मुख्यालयातच लॉटरी प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला. याआधी रंगशारदा येथे होणाऱ्या लॉटरी प्रक्रियेच्या तुलनेत मुख्यालयातच लॉटरी प्रक्रिया राबवल्याने नागरिकांचाच पैसा वाचला आहे. गृहनिर्माण प्रकल्पांसाठी हा पैसा वापरता येईल अशी प्रतिक्रिया म्हाडा कोकण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय लहाने यांनी दिली. अर्जदारांमार्फत मोबाईलवर लाईव्ह वेबकास्टिंग अधिक पसंत केले जात असल्याचेही ते म्हणाले.

- Advertisement -

ऑक्टोबरमध्ये १ हजार घरांसाठी लॉटरी

म्हाडा मुंबई मंडळाची लॉटरी प्रक्रिया ही येत्या ऑक्टोबर महिन्यात राबवण्यात येईल अशी माहिती गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी दिली. मुंबई मंडळाअंतर्गत तयार अशी १००० घरांची लॉटरी काढण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली. या लॉटरी अंतर्गत मुंबईतील अल्प उत्पन्न गटासाठी ९० टक्के घरे असतील असेही त्यांनी स्पष्ट केले.

MHADA took Digital Initiative for Web Casting Lottery System

म्हाडा लॉटरीच गो डिजिटल पाऊलम्हाडाच्या घरांसाठी ऑनलाईन लॉटरीनंतर गेल्या काही वर्षांत वेब ब्रॉडकास्टिंगला अधिक पसंती मिळाली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष सोडतीसाठी येणाऱ्या अर्जदारांमध्ये आता घट झालेली पहायला मिळत आहे.

Posted by My Mahanagar on Saturday, August 25, 2018

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -