घरमुंबईडोंगरीत म्हाडाची सेस इमारत कोसळली

डोंगरीत म्हाडाची सेस इमारत कोसळली

Subscribe

दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू

डोंगरी येथे बुधवारी सकाळी सात मजली इमारत कोसळल्याची घटना घडली. सकाळी ७.२० च्या सुमारास डोंगरी येथील भारत पेट्रोल पंप येथील रझा चेंबर या सात मजली इमारतीचा काही भाग कोसळला. या घटनेत एका ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. मुमताज सुधावाला असे या मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. म्हाडाच्या सेस इमारतींपैकी ही एक इमारत आहे.

इमारतीचा काही भाग कोसळल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन कक्षाला मिळाल्यावर घटनास्थळी लगेचच अग्निशमन दलाचे पथक हजर झाले. एकूण सहा जणांना या इमारतीमधून बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले. सकाळच्या सुमारास या इमारतीचा तिसर्‍या मजल्यापासूनचा मलबा कोसळला होता. त्यामुळे काहीजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. अग्निशमन दलामार्फत या घटनास्थळी बराच वेळ बचाव कार्य सुरू होते. त्याठिकाणी मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही भेट दिली. या ठिकाणी सुरू असलेल्या बचाव कार्याबाबत त्यांनी अग्निशमन दलाच्या अधिकार्‍यांकडून माहिती घेतली.

- Advertisement -

मुंबईतील सेस इमारतींच्या धोकादायक इमारतीमध्ये या इमारतीचा समावेश नव्हता. मुंबई इमारत व दुरूस्ती पुनर्रचना मंडळाद्वारे मान्सूनपूर्व धोकादायक सेस इमारतींची यादी जाहीर करण्यात आली होती. यादीमध्ये मुंबईतील १८ जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींचा समावेश होता. पण रझा चेंबर ही इमारत धोकादायक इमारतींच्या यादीत नव्हती. मुंबईतील इमारत कोसळून लोक मृत्यूमुखी पडण्याची ही या पावसाळ्यातील आणखी एक घटना आहे. मुंबईतील फोर्ट परिसरात झालेल्या दुर्घटनेत १० हून अधिक लोक इमारतीच्या ढिगार्‍याखाली मृत्यूमुखी पडले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -