घरमुंबईएमएचटी सीईटी ऑनलाईन नोंदणी; १ लाखांहून जास्त अर्ज

एमएचटी सीईटी ऑनलाईन नोंदणी; १ लाखांहून जास्त अर्ज

Subscribe

व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा आणि प्रवेश प्रक्रिया ही सीईटी सेलमार्फत राबवण्यात येते. मार्चदरम्यान www. mhtcet.org या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन नोंदणी अर्ज करण्याचे आवाहन सीईटी सेलकडून करण्यात आले आहे.

इंजिनिअरिंग, फार्मसी, कृषी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी महत्वपूर्ण असलेली एमएचटी-सीईटी परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने संकेतस्थळ सुरू केले आहे. आतापर्यंत परीक्षा शुल्क भरुन १ लाख २७ हजार ९६६ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत.

व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा आणि प्रवेश प्रक्रिया ही सीईटी सेलमार्फत राबवण्यात येते. मार्चदरम्यान www. mhtcet.org या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन नोंदणी अर्ज करण्याचे आवाहन सीईटी सेलकडून करण्यात आले आहे. सोमवार सायंकाळपर्यंत १ लाख ७१ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी ३५ हजार ८३१ विद्यार्थ्यांनी अर्धवट अर्ज ठेवले आहेत, तर १ लाख ३४ हजार ७५६ विद्यार्थ्यांनी अंतिम अर्ज भरले आहेत.
दरम्यान, राज्यातून दरवर्षी चार ते पाच लाख विद्यार्थी सीईटी परीक्षा देत असतात. या विद्यार्थ्यांना सराव प्रश्नपत्रिका उपलब्ध करू देण्यात याव्यात, अशी मागणी आहे. परीक्षा आणि प्रश्नांचे स्वरूप विद्यार्थ्यांना करता यावे, वेळेत प्रश्नपत्रिका सोडविण्याचे नियोजन करता यावे, यासाठी विद्यार्थ्यांना सराव प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -