घरमुंबईराष्ट्रवादीचे नरेंद्र पाटीलही भाजपच्या वाटेवर ?

राष्ट्रवादीचे नरेंद्र पाटीलही भाजपच्या वाटेवर ?

Subscribe

नवी मुंबई – पालघर पोटनिवडणुकीत शिवसेनेने भाजपच्या वनगांना पळवल्यावर भाजपनेही या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतर पक्षातील दिग्गजांना आपल्याकडे खेचण्यासाठी गळ टाकले आहेत. यात राष्ट्रवादीच्या निरंजन डावखरे यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचेच आमदार नरेंद्र पाटील हे भाजपाचे दुसरे टार्गेट असल्याची चर्चा आहे. मात्र, नरेंद्र पाटील यांनी याबाबत स्पष्ट शब्दांत नकार दिला असून मी राष्ट्रवादीत राहाणार असून भाजपात जाण्याचा कुठलाही विचार नसल्याचे स्पष्ट केले. माझ्या पक्षांतराच्या शक्यता या अफवा असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, मी माथाडी कामगारांचा नेता असून कामगारांच्या हितासाठी जे मला योग्य वाटेल ते मी करेन, कामगारांचे हित माझ्यासाठी सर्वात आधी महत्वाचे आहे, असे बोलून पाटील यांनी भाजपाबाबत पुढील सूचक शक्यताही वर्तवली आहे.

लवकरच राष्ट्रवादीला रामराम करणार
राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार निरंजन डावखरे हे भाजप मध्ये जाणार असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे. माथाडी कामगार नेते व राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार नरेंद्र पाटील हे माथाडी कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याचे ठोस कारण देऊन लवकरच राष्ट्रवादीला रामराम करणार असल्याची चिन्हे आहेत.
भाजपकडून इतर पक्षांचे आमदार गळाला लावण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. पाटील यांच्याशीही यानिमित्ताने भाजपकडून चर्चा केली जात आहे.

- Advertisement -
पंतप्रधान नरेंद्र मोदी

भाजपला माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवावे लागतील
माथाडी कामागारांचे आराध्य दैवत आण्णासाहेब पाटील यांचे पूत्र आमदार नरेंद्र पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या अनेक वर्षापासून राजकीय वर्तुळात सुरू आहे. आण्णासाहेबांच्या ८३ व्या जयंती निमित्त नवी मुंबईत पार पडलेल्या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी हजेरी लावून या चर्चेत तथ्य असल्याचे स्पष्ट केले होते.
तर माथाडी कामगारांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी काहीही करण्याची तयारी पाटील यांनी दाखवली आहे. आपल्याला भाजपमध्ये घ्यायचे असेल तर माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवावे लागतील, अशी आपली अट त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितली होती. त्यामुळे पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटील कोणत्याही क्षणी भाजपमध्ये जातील, अशी शक्यता आता वाढू लागली आहे.

विधान परिषद आमदार निरंजन डावखरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून ते भाजपमध्ये गेले. त्याचबरोबर मीही भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, त्यात काहीही तथ्य नाही. भाजपात जाण्याचा माजा कुठलाही मानस नाही. मी राष्ट्रवादीतच राहाणार आहे.
– नरेंद्र पाटील, विधान परिषद आमदार (राष्ट्रवादी)

पाटील यांची भाजप नेत्यांशी सलगी वाढल्यानंतर पाटील यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांकडून दबाव वाढला होता. त्यांनी पक्षाचा राजीनामा द्यावा म्हणून अनेकदा अप्रत्यक्षरित्या ताकीदही पक्षाने दिली होती. म्हणून पाटील यांचा पक्षातील वावर कमी झाला होता. माझ्या राजकारणाचा केंद्रबिंदू माथाडी कामगार आहे. त्याच्या भल्यासाठी जे काही करता येईल ते मी करेन, असा पुनरूच्चार करून पाटील यांनी राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढवली आहे.

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -