घरमुंबईमोर्चासाठी मनसेची जय्यत तयारी

मोर्चासाठी मनसेची जय्यत तयारी

Subscribe

विभाग अध्यक्षांना खास आदेश

मनसेच्या महाअधिवेशनानंतर आता सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत त्या मनसेच्या महामोर्चाकडे. बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हाकलवून लावण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 9 फेब्रुवारीला मुंबईमध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, आता या मोर्चासाठी मनसेचे पदाधिकारी कामाला लागले असून, मोर्चा दिवशी प्रत्येक विभाग अध्यक्षाला 20 ते 25 बसेस भरून कार्यकर्ते आणण्याचे आदेश देण्यात आली आहे. राज ठाकरे यांनी मुंबईतील कृष्णकुंज या निवासस्थानी मनसे पदाधिकारी आणि विभाग अध्यक्षांची महत्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत राज ठाकरेंनी पदाधिकार्‍यांना न भूतो, न भविष्यती असा मोर्चा काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान या मोर्चासाठी मुंबई,ठाणे, पुणे आणि नाशिक येथून मोठ्या प्रमाणात मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार असून, हा मोर्चा पूर्णपणे शांततेत पार पाडावा अशा सूचना राज ठाकरे यांनी पदाधिकार्‍यांना दिला. तसेच मोर्चा दरम्यान आपल्याला हिंदूहृदयसम्राट म्हणू नका, मोर्चावेळी झेंड्यावरील राजमुद्रेचा अवमान करू नका, अशा सूचना देखील राज ठाकरेंनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बैठकीत केल्या.

असा असेल मोर्चा
दरम्यान मनसेच्या या मोर्चाला ९ फेब्रवारी रोजी दुपारी २ नंतर होणार असून,या मोर्चासाठी मनसे नेत्यांकडून जिजामाता उद्यान, भायखळा ते आझाद मैदानाचा मार्ग मागण्यात आला आहे. मोर्चासंदर्भात आयोजित बैठकीमध्ये मनसे नेत्यांचा हा निर्णय झाला आहे. हा मोर्चा मोहम्मद अली रोडवरुन नेण्यास मनसे नेते आग्रही असून, या मोर्चाला परवानगी मागण्यासाठी मनसे पदाधिकार्‍यांनी आयुक्तालयात पोलिसांची भेट देखील घेतली. दरम्यान भायखळा ते आझाद मैदान पर्यंतच्या रस्त्याची परवानगी मागण्यात आली असून, मनसे नेते बाळा नांदगावकर आणि शिरीष सावंत यांच्या नेतृत्वात मनसेचे शिष्टमंडळ पोलीस आयुक्तांच्या भेटीसाठी गेले होते. मात्र मनसेच्या मोर्चाबाबतच्या निर्णयाचा चेंडू आता आयुक्तांच्या कोर्टात आहे.

- Advertisement -

अस्लम शेख यांची टीका                                                                                                        दरम्यान मनसेच्या या मोर्चातील मार्गावरून आता काँग्रेस नेते आणि मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख चांगलेच आक्रमक झाले असून, त्यांनी मनसेवर टीका केली आहे. मोहम्मद अली रोडवरून मोर्चा काढण्याची मनसेची मागणी म्हणजे मृतावस्थेत आलेल्या पक्षाला चर्चेत ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे अस्लम शेख म्हणालेत. तसेच मनसे जाणीवपूर्वक कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हणत शेख यांनी मनसेवर जोरदार हल्ला चढवला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -