सृष्टी रासम, विग्नेश पवार कर्णधारपदी

राज्य कबड्डी स्पर्धेसाठी मुंबई उपनगरचे संघ जाहीर

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने बीडला १ ते ४ फेब्रुवारी या कालावधीत होणार्‍या ४६ व्या ज्युनियर मुले/मुली गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनने आपल्या दोन्ही संघ जाहीर केले आहेत. टागोरनगर मित्र मंडळाची सृष्टी रासम मुलींच्या, तर जागर क्रीडा मंडळाचा विग्नेश पवार मुलांच्या संघाचे नेतृत्व करणार आहे. सब-ज्युनियर गट निवड चाचणी स्पर्धेत दमदार कामगिरी करणार्‍या हरजितकौरला बीडला होणार्‍या राज्य स्पर्धेसाठी मुंबई उपनगर ज्युनियर मुलींच्या संघात संधी देण्यात आली आहे.

मुंबई उपनगरचे संघ –
मुली : सृष्टी रासम (कर्णधार), करीना कामतेकर, साक्षी गावडे, काजल खैरे, आरती मतकंटे, शुभदा खोत, सानिका पाटील, सिद्धी ठाकूर, पूजा विनेरकर, प्रसिता पन्हाळकर, कोमल यादव, हरजितकौर संधू. प्रशिक्षक – राजेश पडेलकर, व्यवस्थापक – मंगेश गुरव.

मुले : विग्नेश पवार (कर्णधार), शुभम दिडवाघ, गणेश शिंदे, मयूर मिरगुले, राकेश हेडगे, प्रवीण सिद्धी, जितेश कदम, बाबुराव झोरे, अमन सिंग, सुनील मल्लाह, ओंकार पाटील, राकेश कदम. प्रशिक्षक : प्रदीप माने, व्यवस्थापक : नरेंद्र लाड.

प्राजक्ता पुजारी ठाण्याच्या संघात
बीडला होणार्‍या ४६ व्या ज्युनियर मुले/मुली गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी ठाणे जिल्ह्यानेही आपल्या दोन्ही संघांची घोषणा केली. शक्तीसिंग यादवची मुलांच्या आणि प्राजक्ता पुजारीची मुलींच्या संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे, अशी माहिती जिल्हा संघटनेचे सचिव मालोजी भोसले यांनी दिली.

ठाण्याचे संघ –
मुली : प्राजक्ता पुजारी (कर्णधार), लक्ष्मी गायकर, मानसी गायकर, निधी मोरे, श्रुती मेणे, दिव्या जाधव, देवयानी पाटील, मानसी राजणे, सायली साळुंखे, दीपाली, पागाडे, वृतांशी गाला, श्वेता केदारे. प्रशिक्षिका : चंद्रिका जोशी-केळकर, व्यवस्थापिका : लीना कांबळे-कर्पे.

मुले : शक्तीसिंग यादव (कर्णधार), गौरव पाटील, परेश हरळ, विघ्नेश चौधरी, रोशन जाधव, रमेश शर्मा, वैभव पाटील, मेघराज खांबे, गोकुळ पाटील, पंकजकुमार सिंग, अक्षय भोपी, ऋतिक पाटील. प्रशिक्षक : देवानंद पाटील, व्यवस्थापक : रोशन म्हात्रे.