घरमुंबईमोनोरेल प्रकल्पाचे होणार ड्रोन सर्वेक्षण

मोनोरेल प्रकल्पाचे होणार ड्रोन सर्वेक्षण

Subscribe

चेंबूर ते महालक्ष्मी या परिसरातील विकासकामांचाही घेणार आढावा

चेंबूर ते महालक्ष्मी या संपूर्ण 19.54 किलोमीटरच्या मोनोरेलच्या टप्प्याचे आता ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मोनोरेलने याबाबतची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. भारतातील पहिली मोनोरेल ही मुंबई पूर्व उपनगराला शहराशी जोडण्यासाठी मुंबईच्या वाहतुकीचा महत्त्वाचा असा टप्पा ठरत आहे. चेंबूर ते महालक्ष्मी या परिसरात झालेली नवीन विकासकामे यांचा आढावाही ड्रोन सर्वेक्षणाच्या निमित्ताने घेण्यात येईल. तसेच संपूर्ण परिसराचे दस्तावेजीकरण या सर्वेक्षणाच्या निमित्ताने करण्यात येईल, अशी माहिती मोनोरेल प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.

मोनोरेलची सेवा हा शासकीय उपक्रमाचा भाग आहे. त्यामुळेच राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा प्रकल्पांपैकी एक प्रकल्प म्हणून मोनोरेल प्रकल्पाचे महत्त्व आहे. म्हणूनच या ड्रोनच्या सर्वेक्षणाद्वारे राज्य सरकारचा एक मुख्य वाहतुकीचा प्रकल्प म्हणून या प्रकल्पाचे फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून ड्रोनद्वारे चित्रिकरणाची गरज असल्याचे त्या अधिकार्‍याने सांगितले. मोनोरेलच्या निमित्ताने या मार्गातील परिसरात कोणता विकास झाला आहे. तसेच मोनोरेलच्या पर्यायामुळे या परिसरात कोणते नवे बदल झाले आहेत याचा आढावा या सर्वेक्षणाच्या माध्यमातून घेता येईल. त्यासाठीच हे सर्वेक्षण हाती घेण्यात येणार आहे. या संपूर्ण सर्वेक्षणाच्या कामासाठी ८ लाख ८७ हजार ७६० रूपये खर्च येणार आहे. तसेच या कामाची पुर्तता तीन महिन्याच्या कालावधीत करणे मोनोरेल प्रशासनाला अपेक्षित आहे.

- Advertisement -

मोनोरेलची रखडपट्टी
मोनोरेलच्या ताफ्यातील पाचपैकी दोन ट्रेन सध्या सेवेत नाहीत. तर उर्वरीत दोन धावणार्‍या ट्रेनसाठीही तांत्रिक अडचणींनी घेरले आहे. त्यामुळे ट्रेनची कमी उपलब्धतता असणे तसेच तांत्रिक अडचणी पाठलाग करत असल्यानेच या सगळ्याचा परिणाम हा मोनोरेलच्या फ्रिक्वेन्सीवर झालेला आहे. गुरूवारीही मोनोरेल तब्बल दीड तास उशिराने धावत होती. त्यामुळे अनेक प्रवाशांना तिकिटेही नाकारण्यात आली, अशी परिस्थिती सध्या मोनोरेलच्या प्रवासात अनुभवावी लागत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -