घरमुंबईदुसऱ्या टप्प्यातील मोनोरेलचे आज लोकार्पण

दुसऱ्या टप्प्यातील मोनोरेलचे आज लोकार्पण

Subscribe

मुंबईत दुसऱ्या टप्प्यातील मोनोरेला आजपासून सूरूवात होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोनोरेलचे लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.

मुंबईत आता दुसऱ्या टप्प्यातील मोनोरेल सेवेला आजपासून सूरूवात होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोनोरेलचे लोकार्पण होणार आहे. वडाळा ते सातरस्ता, संत गाडगे महाराज चौक अशी मोनोरेलची सेवा सुरू होणार आहे. एमएमआरडीएचा असा विश्वास आहे की, मोनोरेलच्या पहिल्या टप्प्यापेक्षा दुसऱ्या टप्प्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसात मिळेल. मोनोरेलचा दुसरा टप्पा १२ किलोमीटरचा आहे. वडाळा येथे मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.

पहिला टप्पा अपयशी

फेब्रुवारी २०१४ मध्ये मोनोरेलचा चेंबूर ते वडाळा असा पहिला टप्पा सूरू करण्यात आला होता. परंतु पहिला टप्प्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला नाही. पहिल्या टप्पा हा ८.२६ किलोमीटर लांबीचा आहे. त्या टप्प्यातील स्टेशनवर जास्त वर्दळ नसल्यामुळे पहिला टप्पा अपयशी ठरला. २०१७ मध्ये म्हैसूर कॉलनी स्थानकावर मोनोरेलच्या डब्याला आग लागली होती त्यामुळे पहिला टप्पा बंद करण्यात आला होता. यामुळे एमएमआरडीएला लाखोंचे नुकसान सहन करावे लागले होते.

- Advertisement -

प्रवासी संख्येमध्ये वाढ होईल

मोनोरेलच्या दुसऱ्या टप्प्याची जबाबदारी ही मलेशियाच्या स्कोमी इंजिनियरिंग या कंपनीला देण्यात आली होती. परंतु ती जबाबदारी पार पाडायला कंपनी अपयशी धरली. त्यानंतर एमएमआरडीएने कंपनीला दिलेले कंत्राट काढून घेतले आणि ती जबाबदारी स्वत:कडे घेतली. पहिल्या टप्पामध्ये मोनोरेलची प्रवासी संख्या १७ हजार होती तर दुसऱ्या टप्प्यातील प्रवासी संख्या ही अंदाजे १ लाख असेल, अशी शक्यता एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. वडाळा ते सातरस्तामधील स्थानके वर्दळीचे असल्यामुळे अंदाजे संख्या वर्तवण्यात आली आहे.

दुसऱ्या टप्प्यातील स्थानके

  • जीटीबी नगर
  • ऍण्टॉप हिल
  • आचार्य अत्रे नगर
  • वडाळा ब्रिज
  • दादर पूर्व
  • नायगाव
  • आंबेकर नगर
  • मिंट कॉलनी
  • लोअर परेल
  • संत गाडगे महाराज चौक

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -