घरमुंबईरॅगिंगमुळे २ वर्षात १०० पेक्षा अधिक बळी - न्या. व्ही. एच. चव्हाण

रॅगिंगमुळे २ वर्षात १०० पेक्षा अधिक बळी – न्या. व्ही. एच. चव्हाण

Subscribe

रॅगिंगमुळे अनेक विद्यार्थ्यांचे जीवन उध्वस्त झाले असून २ वर्षात १०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला आहे. चित्रपटात रॅगिंग मनोरंजक पध्दतीने दाखवली जाते, प्रत्यक्षात मात्र ते खुप धक्कादायक आहे, असे मत उल्हासनगर दिवाणी न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश व्ही. एच. चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. दिवाणी न्यायालय, विधी सेवा सहाय्य समिती आणि अंबरनाथमधील गुरुकुल ग्रँड युनियन स्कुल यांच्या पुढाकाराने कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थी आणि पालकामंध्ये कायद्यांविषयी जनजागृती व्हावी, या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला उल्हासनगर न्यायालयातील पाच न्यायाशिध उपस्थित होते. प्रथमच पाच न्यायाधिशांनी विद्यार्थ्यांना कायद्यातील विविध पैलू आणि त्याचे दुष्परिणाम यांची माहिती दिली. मुख्य मार्गदर्शक चव्हाण यांनी विद्यार्थ्यांची रॅगिंग या विषयी माहिती देत त्याचे दुष्परिणाम सांगितले.

ते पुढे म्हणाले की, कायद्यात रॅगिंग करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाईची तरतुदही करण्यात आली आहे, त्याची कठोरपणे अंमलबजावणी केल्यास असे प्रकार रोखता येतील नुकत्याच झालेल्या मुंबईतील मेडिकल कॉलेजमधील डॉ. पायल तडवी यांच्या आत्महत्येचे उदाहरण देत चव्हाण यांनी तडवी प्रकरणात काय घडले आणि कसे घडले याची कल्पना दिली. डॉक्टर तडवी या डॉक्टर असताना त्या देखील रॅगिंग सहन करू शकल्या नाहीत. त्यांनी देखील आत्महत्येचा मार्ग अवलंबला. आत्महत्येचा मार्ग अवलंबणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

उल्हासनगर न्यायालयाचे न्यायाधिश एन. आर. गजभिये, न्यायाधिश एन. ए. माने, न्यायाधिश ई. ए. भास्कर, न्यायाधिश एस. सी. साळवी यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन तालुका विधी सेवा सहाय्य समितीचे सदस्य मनिषा वाळेकर, स्नेहल उपासनी, पी.एस.पाटील, मंजुशा शिंदे, चंदा गान, गुलाब जाधव, शशिकला डोंगरे यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापीका सरिता कठैत, उल्हासनगर बार असोसिएशनचे अध्यक्ष छोटू पॅथालीया, ऍड साधना निंबाळकर, ऍड निखील वाळेकर, महिला आघाडी प्रमुख मालती पवार उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -