घरठाणेशहापूर तालुक्यातील शासकीय कार्यालयाची महावितरणची ९९ लाखांची थकबाकी

शहापूर तालुक्यातील शासकीय कार्यालयाची महावितरणची ९९ लाखांची थकबाकी

Subscribe

पाणी पंपाची थकबाकी सुमारे २ कोटी रुपये

विजेची वापरलेली वीज बिले न भरल्याने महावितरण हे आर्थिक दृष्ट्या हतबल झाल्याने तालुक्यात महावितरणने वसुलीची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार इतर ग्राहकांप्रमाणे शहापूर तालुक्यातील शासकीय कार्यालयाची महावितरणची थकबाकी सुमारे ९९ लाखांची तर पाणी पंपाची थकबाकी सुमारे २ कोटी रुपये असल्याचे उपकार्यकारी अभियंता अविनाश कटकवार यांनी सांगितले.

गेल्या कित्येक महिन्यापासून कोविडच्या कठीण काळात महावितरण कंपनी देखील आर्थिक दृष्टया अतिशय खडतर प्रवास करत आहे. तरीही महावितरणच्या कर्मचारी यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा करण्याचे काम केले आहे. परंतु त्या कठीण प्रसंगात वीज ग्राहकांनी आपली विजेची वापरलेली वीज बिले न भरल्याने महावितरण हे आर्थिक दृष्ट्या हतबल झालेले आहे.

- Advertisement -

त्यामुळे आता महावितरणने वीज बिल वसुलीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. तालुक्यातील महावितरणच्या थकबाकीत शहापूर तालुक्यातील फार मोठ्या प्रमाणात थकित रक्कम ही शासकीय कार्यालये, दवाखाने व ग्रामपंचायत कार्यालय यांची थकबाकी सुमारे ९९ लाख इतकी असून सर्व पाणी पंप यांची थकबाकी सुमारे २ कोटीच्या घरात असल्याने उर्जाखाते महाराष्ट्र शासन यांनी दिलेल्या आदेशानुसार अशा थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे कार्य सुरू आहे. त्यातच शासकीय कार्यालयांवर जी वीज पुरवठा खंडित करण्याची कार्यवाही ती महावितरणची नियमावलीतील कार्य आहे. त्यामुळे महावितरणचे सर्व थकित शासकीय कार्यालये व पाणीपंप ग्राहकांनी आपली थकित वीज बिले मार्च २०२१ च्या पहिल्या ७ दिवसात भरून महावितरण कार्यालयास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -