घरमुंबईभाजपा जागवणार 'आणीबाणी'च्या आठवणी, 'आपातकाल - लोकतंत्रपर आघात' कार्यक्रमाचे आयोजन

भाजपा जागवणार ‘आणीबाणी’च्या आठवणी, ‘आपातकाल – लोकतंत्रपर आघात’ कार्यक्रमाचे आयोजन

Subscribe

स्वातंत्र्यानंतरचा भारतातील काळा इतिहास म्हणून नोंदल्या जाणाऱ्या आणीबाणीतील अत्याचार आणि दडपशाहीच्या कहाण्या समाज आणि तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी मुंबई भाजपाच्या वतीने केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत ‘आणीबाणी’च्या निषेधार्थ विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबई : स्वातंत्र्यानंतरचा भारतातील काळा इतिहास म्हणून नोंदल्या जाणाऱ्या आणीबाणीतील अत्याचार आणि दडपशाहीच्या कहाण्या समाज आणि तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी मुंबई भाजपाच्या वतीने केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत ‘आणीबाणी’च्या निषेधार्थ विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरात बहुतांश ठिकाणी उद्या (ता. 25 जून) भाजपच्या वतीने आणीबाणीच्या निषेधार्थ विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. (Mumbai BJP organized a special program to protest against ‘Emergency’)

हेही वाचा – BMC Covid Scam Case : कंत्राटदार फर्निचरवालाचा वरळीतील फ्लॅट सील, जप्त केलेल्या डायरीत अनेकांचा कच्चा-चिठ्ठा

- Advertisement -

हा कार्यक्रम रविवारी (ता. 25) सायंकाळी 5 वा. वांद्रे (प.) येथील रंगशारदा सभागृहात होईल अशी माहिती भाजपा महामंत्री संजय उपाध्याय यांच्याकडून देण्यात आलेली आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. तर कॅबिनेट मंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा, विधान परिषदेचे गटनेते आ. प्रवीण दरेकर, आ. अतुल भातखळकर, आ. सुनील राणे, आ. अमित साटम, आ. योगेश सागर व इतर नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

25 जून 1975 या दिवशी दिवंगत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली. त्यानंतर देशभर दमनसत्र सुरू झाले. अत्याचार व दडपशाहीमुळे या काळात काँग्रेसने सत्तेचा व बळाचा अमानुष वापर करून देशभर भयाचे व असुरक्षिततेचे वातावरण तयार केले होते. मानवाधिकारांचे व माध्यम स्वातंत्र्याचे हनन करणाऱ्या या काळातील काँग्रेसी अत्याचारांची कहाणी जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी मुंबई भाजपाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे, अशी माहिती भाजपा महामंत्री संजय उपाध्याय यांच्याकडून देण्यात आली आहे.


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -