घरमुंबईMumbai Dahisar Firing: अभिषेक घोसाळकरांच्या पार्थिवाला पाहताच वडिलांनी फोडला टाहो, तर पत्नी-मुलगी...

Mumbai Dahisar Firing: अभिषेक घोसाळकरांच्या पार्थिवाला पाहताच वडिलांनी फोडला टाहो, तर पत्नी-मुलगी धाय मोकलून रडल्या

Subscribe

ज्यावेळी अभिषेक घोसाळकर यांचं पार्थिव घराच्याखाली आणण्यात आलं, तेव्हा त्यांचे वडील विनोद घोसाळकर यांनी टाहो फोडला,  तर अभिषेक घोसाळकर यांची पत्नी आणि मुलगी या दोघींच्या डोळ्यांतले अश्रू थांबत नव्हते.

मुंबई: ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची काल हत्या करण्यात आली. मॉरीस भाई याने अभिषेक घोसाळकर यांना त्यांच्या कार्यालयात बोलावलं. तिथेच फेसबुक लाइव्ह केलं. यावेळी दोघांनीही आपल्यातील वाद मिटल्याचं सांगितलं, पण त्यानंतर अचानक मॉरीसने अभिषेक यांच्यावर धडाधडा गोळ्या घातल्या. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. (Mumbai Dahisar Firing Seeing Abhishek Ghosalkar s body father broke down wife daughter wept)

घोसाळकर यांचं पार्थिवक आज बोरिवली येथील त्यांच्या निवसास्थानी ठेवण्यात आलं. आता उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनीही घोसाळकर कुटुंबाची भेट घेतली. ज्यावेळी अभिषेक घोसाळकर यांचं पार्थिव घराच्याखाली आणण्यात आलं, तेव्हा त्यांचे वडील विनोद घोसाळकर यांनी टाहो फोडला,  तर अभिषेक घोसाळकर यांची पत्नी आणि मुलगी या दोघींच्या डोळ्यांतले अश्रू थांबत नव्हते.

- Advertisement -

तपास गुन्हे शाखेकडे वर्ग

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि दहिसरचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची काल गुरुवारी (ता. 08 फेब्रुवारी) रात्री हत्या करण्यात आले. दहिसर-बोरिवली येथील सामाजिक कार्यकर्ते अशी ओळख असलेले मॉरिस नोरोन्हा यांनी फेसबुक लाइव्ह सुरू असतानाच घोसाळकरांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली आहे. घोसाळकरांची हत्या केल्यानंतर मॉरिसने स्वत:वर गोळ्या झाडत आत्महत्या केली. घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणी एमएचबी पोलीस ठाण्यात शुक्रवारी पहाटे हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. आता या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.

प्रत्यक्षदर्शी महिलेनं काय सांगितलं?

एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना महिलेनं सांगितलं की, गणपत पाटील नगर येथे शिवसेनेचं ऑफस आहे. आम्हाला दुपारी 3 वाजता फोन आला की सर्व महिलांनी तिथे या, त्यानुसार आम्ही गेलो. कशासाठी आम्हाला बोलावलं आहे, हे आम्हाला सांगितलं नव्हतं. पण तिथे आम्ही दोन तास बसलो. मग भाईंनी (अभिषेक घोसाळकर) सांगितलं की, आयसी कॉलनीच्या शाखेमध्ये या. तिथे आम्ही दीड तास बसलो. मग समजलं की मॉरिस साड्यांचं वाटप करणार आहे, असं त्या महिलेनं सांगितलं.

- Advertisement -

( हेही वाचा: Nitin Deshmukh : फडणवीसांनी माझा गेम करण्याचं षडयंत्र रचलं होतं! नितीन देशमुखांचा गौप्यस्फोट)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -