घरमुंबईमुंबई- गोवा महामार्गाच्या कामाला गती येणार

मुंबई- गोवा महामार्गाच्या कामाला गती येणार

Subscribe

मुंबई- गोवा महामार्गाच्या कामामध्ये बहुतांशी ठिकाणचे भूसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या मार्गाच्या किमान दोन लेनचे काम येत्या मार्च अखेरपर्यंत पूर्ण करावे असे निर्देश चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.

मुंबई – गोवा महामार्गाच्या भूसंपादन आणि आतापर्यंत झालेल्या कामाचा आज सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आढावा घेतला. या महामार्गाच्या कामाला गती देऊन येत्या मार्चपर्यंत किमान दोन लेनचे काम पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. मुंबई- गोवा महामार्गाच्या कामामध्ये बहुतांशी ठिकाणचे भूसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या मार्गाच्या किमान दोन लेनचे काम येत्या मार्च अखेरपर्यंत पूर्ण करावे. तसेच या कामकाजाचा वेळोवेळी आढावा घेण्याचे निर्देशही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिले.

चंद्रकांत पाटील यांनी आज मंत्रालयातील दालनात यासंदर्भात बैठक घेतली. या बैठकीमधून त्यांनी आतापर्यंतच्या कामाचा आढावा घेतला. मुंबई-गोवा महामार्गाचे काम कुठपर्यंत आले, काम कसे सुरु आहे यासर्वाचा आढावा त्यांनी आज घेतला. या बैठकीत रस्ते विकास महामंडळाचे श्री. देशपांडे, राष्ट्रीय महामार्ग विकास महामंडळाचे अधिकारी,रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडचे जिल्हाधिकाऱ्यांसह या रस्त्यांची कामे करणाऱ्या कंत्राटदारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -