घरमुंबईMumbai News: मुंबई परिसरातील 27 उड्डाणपुलांचं होणार स्ट्रक्चरल ऑडिट; MSRDC चा निर्णय

Mumbai News: मुंबई परिसरातील 27 उड्डाणपुलांचं होणार स्ट्रक्चरल ऑडिट; MSRDC चा निर्णय

Subscribe

मुंबई महानगर परिसरातील 27 उड्डाणुलांचं स्ट्रक्टरल ऑडिट करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य विकार महामंडळाने (MSRDC) घेतला आहे.

मुंबई: मुंबई महानगर परिसरातील 27 उड्डाणुलांचं स्ट्रक्टरल ऑडिट करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य विकार महामंडळाने (MSRDC) घेतला आहे. यात मुंबईतील महत्त्वाच्या पुलांचा समावेश आहे. आधी ही तपासणी IIT मार्फत केली जाणार होती. मात्र, आता हीच तपासणी VJTI मार्फत करण्याचा निर्णय MSRDCने घेतला आहे. (Mumbai News Structural audit of 27 flyovers in Mumbai area Decision of MSRDC)

MSRDCने मुंबईतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी 1996 मध्ये 55 उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, 27 उड्डाणपूल, 4 भुयारी मार्ग, एक रेल्वे ओव्हर ब्रीज, एक खाडीपूल, चार जंक्शन असे एकूण 37 पूल बांधण्यात आले. दरम्यान, 27 उड्डाणपुलावरील पथकर वसुलीचे अधिकार संपुष्टात येणार असून त्यानंतर हे उड्डाणपूल पालिकेकडे हस्तांतरित केले जाणार आहेत. पुढच्या आठवड्यापासून या कामाला सुरूवात होणार आहे आणि एका महिन्याच्या आत हे काम पूर्ण करण्याचे निर्देश MSRDC ने दिले आहेत.

- Advertisement -

या पुलांची होणार तपासणी

सीएसटी उड्डाणपूल- चेंबूर, अंधेरी घाटकोपर लिकं रो़ड पूल-चेंबूर, विक्रोळी पूल- विक्रोळी, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड पूल- कांजुरमार्ग, गोरेगाव झ्र मुलुंड लिंक रोड पूल-मुलुंड, नितीन कास्टिंग पूल- ठाणे, गोल्डन डाईज पूल- ठाणे, कलिना वाकोला पूल- सांताक्रुझ, आरे कॉलनी पूल- गोरेगाव, फिल्मसिटी पूल- गोरेगाव, नॅशनल पार्क पूल- बोरिवली, सायन उड्डाणपूल-शीव, बीएआरसी जंक्शन पूल-अनुशक्ती नगर, वाशी पूल- वाशी आदी पुलांची तपासणई करण्यात येणार आहे.

संरचनात्मक तपासणी केली जाणार

हे उड्डाणपूल हस्तांतरित करताना ते मजबूत अवस्थेत असावेत असं म्हणत एमएसआरडीसी ने 27 उड्डाणपुलांची संचनात्मक तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आयआयटीमार्फत ही तपासणी करण्याचा निर्णय घेत हे कामही आयआयटीला देण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला. मात्र, आता यात बदलत करत आयआयटीकडून सखोल तपासणी करण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

- Advertisement -

पुलांची भार क्षमता, बेअरिंगची स्थिती, पुलाची मजबुती तपासण्यासह पुलाची दुरुस्ती करणं आवश्यक आहे का हे निश्चित करण्याच्या उद्देशाने ही संरचनात्मक तपासणी करण्यात येणार आहे.

(हेही वाचा: BMC: स्वच्छता मोहिमेत महिन्याभरात १०२ मेट्रिक टन राडारोडा, ७० मेट्रिक टन कचरा संकलन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -