घरताज्या घडामोडीमुंबईच्या नव्या पोलीस आयुक्तांचे मुंबईकर जनतेस पत्र, तक्रार करण्यासाठी शेअर केला खासगी...

मुंबईच्या नव्या पोलीस आयुक्तांचे मुंबईकर जनतेस पत्र, तक्रार करण्यासाठी शेअर केला खासगी मोबाईल नंबर

Subscribe

मुंबई शहराशी आणि त्या माध्यमातून आपल्याशी माझे एक भावनिक नाते जुळलेले आहे. गेली जवळपास ३० वर्षे मी या शहरात आणि पोलीस दलात विविध पदांवर काम केले आहे. मुंबई पोलिसांची स्वतःची एक गौरवशाली परंपरा आणि इतिहास आहे. किंबहुना मुंबईच्या पोलिसांची नेहमीच स्कॉटलंडच्या पोलीसांशी तुलना होत आली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलाचा आयुक्त या नात्याने मुंबईकर जनतेची सेवा करण्याची संधी मला मिळाली आहे. जे माझ्यासाठी गौरवास्पद आणि अभिमानाचे आहे!

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्त झालेले नवे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मुंबईकर जनतेला पत्र लिहीत त्यांच्याशी संवाद साधला आहे. विशेष म्हणजे संजय पांडे यांनी मुंबईतील नागरिकांना काही तक्रारी असतील त्यासंबंधी संपर्क साधण्यासाठी स्वता:च खासगी मोबाईल नंबरही शेअर केला आहे. संजय पांडे यांनी माझे मुंबईकरांशी भावनिक नाते जुळल्याचे म्हटले आहे.

संजय पांडे यांनी पत्रात म्हटलेय,  मुंबई शहराशी आणि त्या माध्यमातून आपल्याशी माझे एक भावनिक नाते जुळलेले आहे. गेली जवळपास ३० वर्षे मी या शहरात आणि पोलीस दलात विविध पदांवर काम केले आहे. मुंबई पोलिसांची स्वतःची एक गौरवशाली परंपरा आणि इतिहास आहे. किंबहुना मुंबईच्या पोलिसांची नेहमीच स्कॉटलंडच्या पोलीसांशी तुलना होत आली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलाचा आयुक्त या नात्याने मुंबईकर जनतेची सेवा करण्याची संधी मला मिळाली आहे. जे माझ्यासाठी गौरवास्पद आणि अभिमानाचे आहे!

- Advertisement -

या कठीण काळात आणि एकूणच कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने आपल्यालाही अनेक अडचणी भेडसावत असणार. त्यामुळे मुंबई पोलीस दलाच्या कामकाजात काही सुधारणा होणे आवश्यक वाटत असल्यास व त्याबाबत आपल्या काही सूचना असल्यास मला 9869702747 या क्रमांकावर जरूर कळवा. अनेकवेळा अगदी छोट्या सूचनाही मोठे बदल घडवून आणू शकतात. त्यामुळे योग्य सूचनांची दखल घेऊन त्यानुसार बदल घडवून आणण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला जाईल, असे संजय पांडे यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

दुसरीकडे मुंबई पोलीस दलातील सर्व अधिकारी व अमलदारांच्या साथीने मी मुंबईकर जनतेला आश्वस्त करू इच्छितो, की त्यांच्या मदतीसाठी, संरक्षणासाठी आणि एकूणच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलीस २४ तास सज्ज आहेत, असे संजय पांडे यांनी शेवटी पत्रात म्हटले आहे.


हेही वाचा – HSC Board Exam : उद्यापासून राज्यात 12 वीच्या परीक्षा, सेंटरवर जाण्याआधी ‘हे’ माहिती करून घ्या

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -