घरताज्या घडामोडीHSC Board Exam : आजपासून राज्यात 12 वीच्या परीक्षा, सेंटरवर जाण्याआधी 'हे'...

HSC Board Exam : आजपासून राज्यात 12 वीच्या परीक्षा, सेंटरवर जाण्याआधी ‘हे’ माहिती करून घ्या

Subscribe

विद्यार्थ्यांना पेपर सुरू करण्याआधी प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी १० मिनिटांचा कालावधी देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेचे हॉल तिकीट बोर्डाच्या अधिकृत वेब साइटवरुन डाऊनलोड करावे लागणार लागणार आहे.

HSC Board Exam : राज्यात अखेर बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्याचा दिवस जवळ आला असून  आजपासून म्हणजेच ४ मार्चपासून राज्यात बाराबीच्या ऑफलाइन परीक्षांना सुरुवात होत आहे. कोरोना महामारीनंतर राज्यात पहिल्यांदा विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षा सेंटर्सना जाऊन परीक्षा देणार आहेत. ४ मार्च ते ३० एप्रिल या कालावधीत बारावीच्या परीक्षा होणार आहेत. दोन सत्रांमध्ये बारावीच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. पहिले सत्र सकाळी १०:३० ते दुपारी २ वाजेपर्यंत तर दुसरे सत्र हे दुपारी ३ ते संध्याकाळी ६: ३० वाजेपर्यंत असणार आहे.

विद्यार्थ्यांना पेपर सुरू करण्याआधी प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी १० मिनिटांचा कालावधी देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेचे हॉल तिकीट बोर्डाच्या अधिकृत वेब साइटवरुन डाऊनलोड करावे लागणार लागणार आहे. याआधी छोट्या कॉलेजमध्ये एकाच सेंटरवर विद्यार्थ्यांना एकत्र करुन एकत्र परीक्षा घेतल्या जात होत्या मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक कॉलेजमध्ये परीक्षा केंद्र ठेवण्यात येणार आहे. परीक्षांच्या व्यवस्थेमध्ये देखील बदल करण्यात आले आहेत. काय आहेत बदल आणि परीक्षेचे वेळापत्रक जाणून घ्या.

- Advertisement -
  • विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका वाटण्यासाठी दोन टोल वाजवण्यात येणार तर प्रश्नपत्रिका वाटण्यासाठी एक टोल वाजवण्यात येणार.
  • पेपर सोडवायला सुरुवात करण्यासाठी पुन्हा एक टोल वाजवला जाईल. पहिला एक तास संपल्यानंतर दोन आणि दुसरा तास संपल्यानंतर दोन टोल वाजवण्यात येतील.
  • पेपर सोडवण्याची शेवटची १० मिनिटे बाकी असताना एक टोल आणि लिखाण थांबवण्यासाठी एक टोल वाजवण्यात येईल.
  • एका हॉलमध्ये २५ विद्यार्थी बसतील. झिकझॅक पद्धतीने विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था करण्यात येईल.
  • परीक्षेचा वेळ अर्ध्या तासाने वाढवून देण्यात आला आहे. आता ३ ऐवजी साडेतीन तासाचा वेळ परीक्षेसाठी देण्यात आला आहे.

बारावी परीक्षेचे संपूर्ण  वेळापत्रक

४ मार्च – इंग्रजी – ( १०:३० ते २ )
८ मार्च – संस्कृत (१०:३० ते २)
९ मार्च – ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स एड मॅनेजमेंट (१०:३० ते २)
१० मार्च – लॉजिक, फिजिक्स (१०:३० ते २)
११ मार्च – SP, होम मॅनेजमेंट (१०:३० ते २)
१२ मार्च – केमिस्ट्री (१०:३० ते २) पोलिटिकल सायन्स (३ ते ६:३० )
१४ मार्च – मॅथेमॅटिक्स एंड स्टॅटिस्टि (१०:३० ते २)
१५ मार्च – चाईल्ड डेव्हलपमेंट, अग्रीकल्चर सायन्स एंड टेक्नलॉजी, अॅनिमल सायन्स एंड टेक्नलॉजी (१०:३० ते २)
१६ मार्च – कोऑप्रेशन (१०:३० ते २)
१७ मार्च – बायोलॉजी, हिस्ट्री एंट डेव्हलपमेंट ऑफ इंडियन म्युझिक (१०:३० ते २)
१९ मार्च – जिओलॉजी (१०:३० ते २) इकोनॉमिक्स (३ ते ६:३० )
२१ मार्च – टेक्सटाइल (१०:३० ते २) बुककिपींग एंट अकाउटन्सी (३ ते ६:३० )
२२ मार्च – फूड सायन्स एंड टेक्नलॉजी (१०:३० ते २) फिलोसॉफी आणि हिस्ट्री ऑफ आर्ट एंट एप्रिसिएशन (३ ते ६:३० )
२३ मार्च – बी फोकल कोर्स पेपर १ इलेक्ट्रिकल मेंटेनन्स, मेकॅनिकल मेंटेनन्स, स्कूटर आणि मोटरसायकल सर्व्हिसिंग (१०:३० ते २)
२५ मार्च – BI-फोकल कोर्सेस पेपर-II, तांत्रिक गट पेपर-II, इलेक्ट्रिकल मेंटेनन्स, मेकॅनिकल मेंटेनन्स, स्कूटर आणि मोटरसायकल सर्व्हिसिंग (३ ते ६:३० )
व्यावसायिक अभिमुखता: ग्रंथालय आणि माहिती विज्ञान (३ ते ६:३० )

- Advertisement -

२६ मार्च – भूगोल (३ ते ६:३० )
२८ मार्च – इतिहास – (३ ते ६:३० )
२९ मार्च – डिफेन्स स्टडिइज (३ ते ६:३० )
३० मार्च – समाजशास्र (३ ते ६:३० )
५ एप्रिल – हिंदी (१०:३० ते २) जर्मन, जॅपनिस, चायनिस, पर्शियन (३ ते ६:३० )
७ एप्रिल – मराठी, गुजराती,कन्नड, सिंधी, मल्याळम, तमिळ, तेलुगू, पंजाब, बंगाली (१०:३० ते २) उर्दू, फ्रेंच, स्पॅनिश, पाली (३ ते ६:३० )


हेही वाचा – Kelve Beach : केळवा समुद्रात 6 जण बुडाले, तीन जण अद्यापही बेपत्ता

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -