घरमुंबईMumbai Spirit : मुंबई पूर्वपदावर; लोकल सुरू; मध्यरेल्वेचे सुटीचे वेळापत्रक

Mumbai Spirit : मुंबई पूर्वपदावर; लोकल सुरू; मध्यरेल्वेचे सुटीचे वेळापत्रक

Subscribe

काळच्या मुसळधार पावसानंतर विस्कळीत झालेले मुंबईचे जनजीवन आज सकाळपासून हळूहळू पूर्वपदावर येत आहे. काल ज्या ठिकाणी पाणी साचलेले होते, तेथील पाणी आता ओसरत चालले आहे. मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकलसेवा पूर्वपदावर येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, माटुंगा, माहिम, दादर स्टेशन परिसरात रस्त्यावरील पाणी ओसल्याची स्थिती सकाळी होती.

मात्र काल झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर आज मध्य रेल्वे अजूनही पूर्णता रूळावर आलेली नाही. बाहेरगावी जाणाऱ्या रेल्वे आज रद्द करण्यात आल्या आहे. मुंबईभुसावळ पॅसेंजर सारख्या काही गाड्यांचा त्यात समावेश आहे. मात्र लोकल सेवा थोडी उशिराने पण सुरळीत सुरू आहे. पावसामुळे घ्याव्या लागलेल्या कालच्या सुटीनंतर आज सकाळपासून लोकलसाठी गर्दी केल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

.रे.चे सुटीचे वेळापत्रक

मुंबईत गेल्या दोन दिवसाच्या मुसळधार पावसामुळे मुंबईची लोकल वाहतूक विस्कळती झाली होती. मंगळवारी दुपारनंतर पाऊस थांबल्याने रेल्वे प्रवाशांना काही काळ दिलासा मिळाला होता. पण बुधवारी मुंबईकरांना रेल्वे गोधळाच्या सामना करावा लागत आहे. कारण मध्य रेल्वे प्रशासनाने बुधवारी सुट्टीच्या वेळापत्रकाप्रमाणे लोकल गाड्या चालविण्याच्या निर्णय जाहीर केला आहे. या वेळापत्रकाप्रमाणे सकाळपासून लोकल सोडण्यात येत असल्या, तरी त्यात काही वेळ उशीर होत आहे. लोकलची संख्या कमी असल्याने स्थानकांवर गर्दी होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -