घरमुंबईअतिवृष्टीमुळे मुंबई विद्यापीठाची प्रवेशप्रक्रिया पुढे ढकलली

अतिवृष्टीमुळे मुंबई विद्यापीठाची प्रवेशप्रक्रिया पुढे ढकलली

Subscribe

अतिवृष्टीमुळे मुंबई विद्यापीठाने संलग्न महाविद्यालयातील प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला ५ ऑगस्टपर्यंत दुपारी ३ वाजेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार पहिली गुणवत्ता यादी गुरुवारी सकाळी ११ वाजता जाहीर करण्यात येणार आहे.

मुंबईत सोमवारी रात्रीपासून झालेला जोरदार पाऊस आणि मंगळवारी दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली. अतिवृष्टीमुळे मुंबई विद्यापीठाने संलग्न महाविद्यालयातील प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला ५ ऑगस्टपर्यंत दुपारी ३ वाजेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार पहिली गुणवत्ता यादी गुरुवारी सकाळी ११ वाजता जाहीर करण्यात येणार आहे.

कर्मचारी महाविद्यालयात पोचू शकले नाही

बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर मुंबई विद्यापीठाने पदवी प्रथम वर्षाच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार २४ जुलैपासून प्रवेश अर्ज करण्यास सुरुवात झाली. विद्यार्थांना ४ ऑगस्टपर्यंत विद्यार्थांना अर्ज करता येणार होता. तसेच पहिली गुणवत्ता यादी ४ ऑगस्टला सायंकाळी ७ वाजता जाहीर करण्यात येणार होती. मात्र मुंबईत कोसळत असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबले आहे. यामुळे गुणवत्ता यादी जाहीर करण्यासाठी कर्मचारी महाविद्यालयात पोचू शकले नाहीत. हवामान विभागाने अतिवृष्टीचा अंदाज वर्तविल्याने खबरदारी म्हणून सरकारने सरकारी कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार विद्यापीठाने प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जारी केले आहे.

- Advertisement -

पहिली गुणवत्ता यादी ६ ऑगस्टला

वेळापत्रकानुसार प्रवेश पूर्व नोंदणी आणि महाविद्यालयांचे अर्ज ५ ऑगस्टपर्यंत विक्री होतील. पहिली गुणवत्ता यादी ६ ऑगस्टला सकाळी ११ वाजता जाहीर होईल. या यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थांना कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरण्यासाठी ११ ऑगस्टपर्यंत दुपारी ३ वाजेपर्यंत प्रवेश घेता येईल. दुसरी गुणवत्ता यादी ११ ऑगस्टला सायंकाळी ७ वाजता जाहीर होईल. या यादीतील विद्यार्थांना १२ ते १७ ऑगस्ट या कालावधीत प्रवेश घेता येणार आहे. तर तिसरी गुणवत्ता यादी १७ ऑगस्टला सायंकाळी ७ वाजता जाहीर होईल. विद्यार्थांना १८ ते २१ ऑगस्ट या कालावधीत प्रवेश घेता घेता येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -