घरमुंबईमोबाईल आणि टीव्हीमुळे उडाली मुंबईकरांची झोप

मोबाईल आणि टीव्हीमुळे उडाली मुंबईकरांची झोप

Subscribe

मोबाईल फोनचा वाढता वापर यामुळे मुंबईकरांमध्ये मनस्ताप वाढला आहे. नुकत्याच केलेल्या एका सर्व्हेत ही माहिती समोर आली आहे.

बदललेली जीवनशैली, वाढलेला कामाचा ताण आणि त्यातून सोशल मीडियाचा वाढलेला प्रचंड वापर या सर्वांचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. शिवाय, २४ तास सोबत बाळगणाऱ्या मोबाईलच्या वापरामुळे लागलेल्या सवयीचा परिणाम सध्या मुंबईकरांच्या झोपेवर होत असल्याचं दिसून येत आहे. मोबाइल फोन आणि टीव्ही या जीवनशैली बिघडवणाऱ्या गोष्टी पुरेशी झोप न मिळण्याची प्रमुख कारणं ठरली आहेत. त्यातून मुंबईकरांची निद्रानाश झाली असल्याचं एका सर्व्हेक्षणातून समोर आले आहे. अपुऱ्या झोपेमुळे ८१% मुंबईकर निद्रानाशाने ग्रस्त असल्याचे या सर्व्हेत समोर आलं आहे. सोबतच कामाच्या ठिकाणी झोपेच्या प्रमाणात वाढ झाली आहे. वेकफिट.कोच्या ग्रेट इंडियन स्लीप स्कोअरकार्ड २०१९ मध्ये हा सर्व्हे मांडण्यात आला आहे.

८० % हून अधिक नागरिक ग्रस्त

पुरेशी झोप मिळत नसल्याचा परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यासह कामावरदेखील होत आहे. ८१% मुंबईकर निद्रानाशाच्या विकाराने ग्रस्त असून अपुऱ्या झोपेमुळे ७८ टक्के मुंबईकरांना आठवड्यातून १-३ वेळा कामावर झोप येत असल्याचे सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. अपुऱ्या झोपेमुळे मन आणि शरीरावर परिणाम होत असून सतत थकल्यासारखे वाटते. अपु-या झोपेमुळे ५२ टक्के लोकांना पाठदुखीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. आपल्या शरीराच्या रचनेनुसार रात्री १० ते १०.३० ही झोपण्याची नियमित वेळ असावी असा सल्ला दिला जातो. सर्वेक्षणातून असे दिसून आले की, ३६ टक्के लोक ७ तासांपेक्षा ही कमी झोपतात. तर, ९० टक्के लोकांना रात्री एक – दोन वेळा जाग येते.

- Advertisement -

काय आहे सर्व्हेक्षणात माहिती

मुंबईकरांना रात्रभर जागवणाऱ्या गोष्टींमध्ये स्मार्टफोन्स, टीव्ही अशी साधने जबाबदार आहेत. जवळपास ९० टक्के लोक झोपण्यापूर्वी आपला फोन वापरतात. २४ टक्के लोकांनी सांगितले की लॅपटॉपवर किंवा स्मार्टफोनवर काही कार्यक्रम पाहत पाहिल्याने ते जागे राहतात. तर कामाबाबत किंवा पैशांची चिंता सतावत असल्याने झोप न येणाऱ्यांची संख्या २३ टक्के इतकी आहे.

याविषयी वेकफिट. कोचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित गर्ग म्हणाले, “ झोपेच्या कमतरतेमुळे उच्च रक्तदाबापासून ते चिंता वाढण्यापर्यंत अनेक प्रकारच्या आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात. ग्रेट इंडियन स्लीप स्कोअरकार्ड २०१९ मधून याची कल्पना येते की भारतीय लोक कसे या समस्यांकडे अजून दुर्लक्ष करत आहेत. तसंच, बहुतांशी लोक झोपेसंबंधीच्या विकारांना समस्या मानतच नाहीत. याबाबत मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -