घरमुंबईकुठे पाऊस पडणार, किती पाणी साचणार?

कुठे पाऊस पडणार, किती पाणी साचणार?

Subscribe

मुंबईकरांना मिळणार पावसाची आगाऊ माहिती

मुंबईत कोणत्या भागात किती पाणी साचणार, कोणत्या भागात किती पाऊस पडणार यांसारखे पावसाचे अचूक अपडेट्स येत्या काळात मुंबईकरांना सहज उपलब्ध होणार आहेत. कारण मोठ्या शहरांमध्ये हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठीच्या एका विशेष प्रकल्पाअंतर्गत मुंबईची निवड खुद्द पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने केली आहे. या प्रकल्पांतर्गत मुंबईत हवामानाच्या अंदाजाची माहिती वर्तवणे सहज शक्य होणार आहे.

पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने स्पेशल फोरकास्ट मेकॅनिझम अंतर्गत हवामानाचा ठिकाणांनिहाय अंदाज वर्तवण्यासाठी एक विशेष प्रकल्प हाती घेतला आहे. मुंबईसारख्या ५० लाखांची संख्या असलेल्या शहरांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाची सुरूवात ही मुंबई शहरापासून होईल, त्यानंतर हा प्रकल्प इतर देशांमध्ये राबविण्यात येणार आहे. मुंबईची लोकसंख्या ही १ कोटींहून अधिक आहे. तर मुंबईतल्या प्रवास करणार्‍यांची संख्या ही ५० लाख इतकी आहे. त्यामुळेच आपापल्या भागातील अपडेट्स हे तत्काळ मिळावेत म्हणून हा विशेष प्रकल्प मुंबईसाठी राबविण्यात येईल. स्पेशल फोरकास्ट मेकॅनिझमच्या माध्यमातून मुंबईकरांना आपल्या भागातील हवामानाच्या अंदाजाची माहिती मिळेल. ब्लॉक लेव्हल फोरकास्टसाठी मुंबई हे पहिले शहर आहे. संपूर्ण एमएमआर भागासाठी हे अपडेट्स मिळतील. वैज्ञानिक माहितीवर आधारीत असे हे न्युमरीकल मॉडेल असणार आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने यासाठी समितीची स्थापना केली आहे, असे प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले.

- Advertisement -

मुंबईसाठी ४ अतिरिक्त डॉपलर रडारही शहरात बसविण्यात येणार आहे. सध्याची डॉपलर रडार ही नौदलाच्या जागेत आहेत. त्यामुळे अनेकदा देखभाल दुरूस्तीची कामे तसेच सर्वसामान्यांना हे तंत्रज्ञान पाहता येत नाही. नवी मुंबई, ठाणे, घाटकोपर किंवा बीकेसी तसेच गोरेगाव याठिकाणी हे रडार बसविण्यात येणार आहेत. या डॉपलर रडारसाठी जागतिक निविदा प्रक्रिया प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबईमार्फत राबविण्यात येणार आहे.

मध्य, पश्चिम रेल्वेवर रेनगेज
मुंबईसाठी आणखी ६० रेनगेज (पर्जन्यमापके) बसविण्यात येणार आहेत. त्यामध्ये उपनगरीय लोकलच्या मार्गावरही रेनगेजचा वापर करण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेने रेनगेजसाठी काही ठिकाणे उपलब्ध करून दिली आहेत. तर मध्य रेल्वेच्या मार्गावरही रेनगेजसाठी हवामान विभाग जागा शोधत आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -