घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरबळजबरीने राजीनामा द्यायला लावला, IAS केंद्रेकरांच्या स्वेच्छानिवृत्तीनंतर दानवेंचा आरोप

बळजबरीने राजीनामा द्यायला लावला, IAS केंद्रेकरांच्या स्वेच्छानिवृत्तीनंतर दानवेंचा आरोप

Subscribe

छत्रपती संभाजीनगर: विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत असलेले सुनील केंद्रेकरांनी (Sunil Kendrekar) स्वेच्छानिवृत्ती घेतल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. त्यांनी अचानक स्वेच्छानिवृत्ती घेतल्यामुळे राजकीय, प्रशासकीय वर्तुळात आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान, केंद्रेकर यांना स्वेच्छानिवृत्ती घेण्यासाठी भाग पाडण्यात आले असून त्यांना बळजबरीने राजीनामा द्यायला लावला, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला आहे.

सुनील केंद्रेकर यांच्या एका निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला आहे. शासकीय सेवेचे दोन वर्षे बाकी असतानाच केंद्रेकरांनी अचानक स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे शासनाने त्यांचा अर्ज मंजूर देखील केला आहे. परंतु त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली नसून त्यासाठी त्यांना भाग पाडण्यात आल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे

- Advertisement -

अंबादास दानवे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, सुनील केंद्रेकर मराठवाड्याच्या मातीशी जुळलेले आहेत. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण आहे. त्यांनी एक सर्व्हे केला होता, तसेच त्याबाबत सरकारला काही सूचना केल्या. याच्या बातम्या देखील आल्या होत्या. मात्र याचा सरकारमधील लोकांना त्रास झाला, त्यामुळे केंद्रेकरांना राजीनामा द्यायला भाग पाडण्यात आले. ही स्वेच्छानिवृत्ती नसून त्यांना बळजबरीने राजीनामा द्यायला लावला असेल, असं दानवे म्हणाले.

मागील महिन्यात सुनील केंद्रेकर यांनी शासनाकडे व्हीआरएससाठी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या या निर्णयावर औरंगाबाद खंडपीठाने मोठा निर्णय घेतला होता. केंद्रेकरांनी दिलेल्या स्वेच्छानिवृत्तीसाठी दिलेला अर्ज सरकारने स्वीकारू नये, असा आदेश दिला होता. मार्च 2024 पर्यंत केंद्रेकर यांचा स्वेच्छानिवृत्ती अर्ज स्वीकारु नये, असं न्यायालयाने म्हटलं होतं. पण मंगळवारी त्यांचा अर्ज शासनाकडून मान्य करण्यात आला.

- Advertisement -

हेही वाचा : IAS अधिकारी सुनील केंद्रेकर घेणार स्वेच्छानिवृत्ती; शासनाकडून अर्ज मान्य


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -