घरमुंबईमहापालिकेच्या परिवहन ठेकेदाराला 8 कोटींचा दंड

महापालिकेच्या परिवहन ठेकेदाराला 8 कोटींचा दंड

Subscribe

लोकायुक्तांचा आदेश

शासनाचा कर चुकवतानाच निकृष्ट सेवा देणार्‍या वसई-विरार महापालिकेच्या परिवहन ठेकेदाराला 8 कोटी रुपयांचा दंड भरण्याचे आदेश लोकायुक्तांनी दिले आहेत.महापालिकेने 2012 पासून भगिरथ ट्रान्स कॉर्पोरेशन कंपनीला परिवहन सेवेचा ठेका दिला होता. तेव्हापासून गेल्या सात वर्षात भगिरथने निकृष्ट सेवा देतानाच करांचेही उल्लंघन केले असल्याची तक्रार चरण भट या नागरिकाने लोक आयुक्तांकडे केली होती. त्यावर सुनावणी होवून राज्याचे उपलोकायुक्त एस.के.शर्मा यांनी पालिका आयुक्त बळीराम पवार यांच्या उपस्थितीत सुनावणी दिली. ठेकेदाराने प्रवासी कर आणि बालपोषण अधिभाराची शासनाकडे भरणा करायची असते आणि पालिकेने त्याची वसुली करायची असते. या दोन्ही बाबींकडे दुर्लक्ष झाल्याबद्दल शर्मा यांनी ताशेरे ओढले. तसेच 8 कोटी रुपये भरण्याचे आदेश यावेळी ठेकेदाराला दिले.

पालिकेकडून १२ बसेस जप्त
ही रक्कम वसूल न केल्यास पालिकेला मिळणार्‍या अनुदानातून ती वजा करण्यात येईल असेही उपलोकायुक्तांनी यावेळी आदेश दिले. या प्रकरणी पालिकेने ठेकेदाराच्या 4 बस जप्त केल्याचे पालिका आयुक्त पवार यांनी यावेळी स्पष्टीकरण दिले. त्यावर सर्व बस जप्त केल्या तरी दंडाची रक्कम वसूल होणार नसल्याचे लोकाआयुक्तांनी यावेळी ठणकावले. परिवहन सेवेच्या बस भंगार असून चांगली सेवा देता येत नसेल तर नवीन निविदा काढाव्यात असे आदेशही यावेळी देण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -