घरमुंबईटेलिव्हिजन अभिनेत्री आरजू गोवित्रीकर झाली कौटुंबिक हिंसाचाराची शिकार

टेलिव्हिजन अभिनेत्री आरजू गोवित्रीकर झाली कौटुंबिक हिंसाचाराची शिकार

Subscribe

टेलिव्हिजन अभिनेत्री आरजू गोवित्रीकरने पती विरोधात वरळी पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. मागील काही वर्षांपासून पतीने आपला मानसिक आणि शारीरिक छळ केला असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. या घटनेची सीसीटीव्ही पुटेज पोलिसांना देण्यात आली आहे.

टेलिव्हिजन अभिनेत्री आरजू गोवित्रीकर ही कौटुंबिक हिसाचाराची शिकार झाली आहे. या प्रकरणी आरजूने आपला पती सिद्धार्थ विरोधात वरळी पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. पती सिद्धार्थ सब्बरवाल हा आपल्याला मद्याच्या नशेत मारतो असा आरोप तिने केला आहे. मॉडेल आणि अभिनेत्री अदिती गोवित्रीकर हिची बहिण आरजूने २०१० मध्ये प्रेम विवाह केला होता. मागील काही वर्षांपासून पती सिद्धार्थ आपल्याला त्रास देत असल्याचे तिने आरोप केला आहे. मद्याच्या नशेत त्याने केलेल्या मारहाणीचा सीसीटीव्ही फुटेजही तिने पोलिसांना दिला आहे. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून पुढील कारवाईस सुरुवात केली आहे. आरजूने बागबान, मेरे बाप पहेले आप आणि तुलसी सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

 

View this post on Instagram

 

Happy new year from US to YOU❤️??

A post shared by Arzoo Govitrikar (@arzoogovitrikarr) on

- Advertisement -

सकाळी चार वाजता केली मारहाण

आरजू आपल्या पतीसोबत वरळीतील पोचखानवाला रोड परिसरात राहते. मात्र पती मारहाण करत असल्याने ती मागील काही दिवसांपासून घरी गेली नाही. १९ फेब्रुवारी रोजी आरजूने गुन्हा नोंदवला होता. १५ तारखेला तिच्यापतीने मद्याच्या नशेत तिला मारहाण केली होती. मद्य पीण्याच्या सवई वरून या दोघांचा वाद झाला होता. रात्रभर हा वाद सुरु असून सकाळी ४ वाजता तिला पुन्हा मारहाण करण्यात आली. मारहाणी दरम्यान पतीने आपल्या चेहऱ्यावर थुंकले असे ही तिने म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -