घरमुंबईONGC प्रकल्पात पुन्हा गळती; भीषण दुर्घटना टळली

ONGC प्रकल्पात पुन्हा गळती; भीषण दुर्घटना टळली

Subscribe

उरण येथील ओएनजीसीच्या एपीयु प्रकल्पामधून बुधवारी पहाटे मोठ्या प्रमाणावर नाफता या ज्वलनशील पदार्थाची गळती सुरू झाली.

काही दिवसांपूर्वी उरणच्या ONGC गॅस प्रकल्पामध्ये भीषण आग लागण्याची दुर्घटना घडली होती. अवघ्या काही दिवसांतच पुन्हा एकदा उरणचा ONGC प्रकल्प भीषण दुर्घटनेच्या काठावर जाऊन पोहोचला आहे. ONGCच्या एपीयु प्रकल्पामध्ये नाफता गळती झाल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री दीडच्या सुमारास ही गळती सुरू झाली. मात्र, हा प्रकार पहाटे पाचच्या सुमारास लक्षात आला. त्यानंतर तातडीने या नाफतावर मोठ्या प्रमाणावर फोम मारण्यात आलं. जेणेकरून त्याचा ऑक्सिजनशी संपर्क होऊन तो पेट घेऊ नये. ३ सप्टेंबर रोजी अशाच प्रकारे ओएनजीसीमधून गॅस गळती होऊन तब्बल २० मीटर उंचीच्या ज्वाळा पसरल्या होत्या. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आली होती. आज पहाटे जी गळती झाली, ती वेळीच लक्षात आली नसती, तर तिथे देखील आग भडकण्याची शक्यता होती.


हेही वाचा – उरणच्या ओएनजीसी गॅस प्रकल्पात आग; ७ जणांचा मृत्यू

नाफता म्हणजे काय?

द्रव्य स्वरूपात असलेल्या हायड्रोकार्बनचं मिश्रण म्हणजे नाफता. पेट्रोल किंवा डिझेलपेक्षाही नाफथा अनेक पटींनी अधित ज्वलनशील असतो. सकाळी गळती झालेला नाफता पेट घेऊ नये म्हणून त्याच्यावर फोमचा मारा करण्यात आला. त्यामुळे ऑक्सिजनशी संपर्क येऊन नाफता पेटला नाही. अन्यथा भीषण परिस्थिती उद्भवली असती.

- Advertisement -

ओएनजीसी प्रकल्पात नाफता गळती, भीषण दुर्घटना टळली!

ओएनजीसी प्रकल्पात नाफता गळती, भीषण दुर्घटना टळली!

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 24, 2019

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार मनोहर भोईर घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी ओएनजीसीच्या अधिकाऱ्यांशी बोलून माहिती घ्यायला सुरुवात केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -