घरमुंबईअट्टल गुन्हेगारांची दोन वर्षासाठी शहरातून हकालपट्टी

अट्टल गुन्हेगारांची दोन वर्षासाठी शहरातून हकालपट्टी

Subscribe

धार्मिक उत्सव पहाता शहरातील गुन्हेगारीला जरब बसावा यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत सदर कारवाई करण्यात आली

नवी मुंबई : मारामारी, जबरी चोरी, खून, घरफोडी, अपघात, विनयभंग, दरोड्याची तयारी यासह अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असणार्‍या तब्बल २९ गुन्हेगारांना मुंबई उपनगर, ठाणे व रायगड जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. डिसेंबरपर्यंत असणारे धार्मिक उत्सव पहाता शहरातील गुन्हेगारीला जरब बसावा यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत सदर कारवाई करण्यात आली असल्याचे परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त सुधाकर पठारे यांनी सांगितले.

यशवंत जनार्दन कविलकर (नेरूळ), संजय मणी जोसेफ (नेरूळ), शंकर तुळशीराम राठोड (रबाळे), सागर विजय म्हात्रे (नेरूळ), विजय बाबू राठोड (एपीएमसी), अजय बाळासाहेब कळसे (वाशी), बबलु मजब मंडल (एपीएमसी), अजय अंकुश राठोड (वाशी), मंगेश गोविंद साबळे (रबाळे एमआयडीसी), विजय मनबोथ गुप्ता (तुर्भे एमआयडीसी), अस्लम अक्रम शेख (तुर्भे एमआयडीसी), महेंद्र गोपीचंद बाविस्कर (सीबीडी), विवेक वीरेंद्र वाल्मिकी (रबाळे), विनोद गोपाळ चव्हाण (रबाळे एमआयडीसी), अमित शिवाजी पवार (रबाळे एमआयडीसी), अनिल रामविलास यादव (तुर्भे एमआयडीसी), दीपक मुरलीधर शीलवंत (तुर्भे एमआयडीसी), सीताराम मल्लेश कांबळे (रबाळे एमआयडीसी), सहदेव अनिल कदम (रबाळे एमआयडीसी), देवेंद्र नागप्पा कांबळे (रबाळे एमआयडीसी), उमेश देवराज चव्हाण (कोपरखैरणे), इंद्रजीत रामकिशोर जयस्वाल (रबाळे एमआयडीसी), सुरज शिवशंकर जयस्वाल (रबाळे एमआयडीसी), विश्राम रामभरण यादव (रबाळे एमआयडीसी), वीरेंद्र रामसेवक यादव (रबाळे एमआयडीसी), विजय सुर्‍या शेट्टी (वाशी), कुणाल रणजीत यादव (कोपरखैरणे), प्रदीप श्रीरंग पाटील (कोपरखैरणे) व अकबर हुसेन नाईक (रबाळे एमआयडीसी) अशी दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

- Advertisement -

या आरोपींवर मारामारी, गर्दी, जबरी चोरी, दारूबंदी, दरोड्याची तयारी, खून, घरफोडी, जबरी चोरी, अपघात, एनडीपीएस, ठकबाजी, विनयभंग, जुगार कारवाई, मोटारसायकल चोरी अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. या आरोपींना दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आल्या नंतर परिमंडळ १ मधील १० पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या अजून वरील गुन्ह्यांशी निगडीत आरोपींचा शोध घेण्यात आला. त्यातील ७१ जणांविरोधात ११० कलम तर २० जणांविरोधात १५१(३) कलम कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. हद्दपार करण्यात आलेले कोणतेही आरोपी मुंबई उपनगर अथवा ठाणे – रायगड जिल्ह्यात आढळून आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश संबधित पोलीस ठाण्यांना देण्यात आले असल्याचे पोलीस उपायुक्त सुधाकर पठारे यांनी सांगितले.

गणेशोस्तवाच्या पार्श्वभूमीवर ऑगस्ट २०१८ महिन्यापासून आतापर्यंत १६ जणांना हद्दपार करण्यात आले असून त्या अगोदर व आताचे असे एकूण २९ जणांना दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. अशा आरोपींवर हद्दपारची कारवाई करण्यात आल्याने नवी मुंबईतील कायदा व सुव्यवस्था राखण्यास तसेच सण – उत्सवादरम्यान शांतता प्रस्थापित करण्यात मदत होणार आहे.
-सुधाकर पठारे – उपायुक्त परिमंडळ १

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -