घरमुंबई१२१७ कोटी खर्च न करण्याची मोठी नामुष्की

१२१७ कोटी खर्च न करण्याची मोठी नामुष्की

Subscribe

नवी मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प जाहीर

३८५० कोटी रूपये जमेचा आणि ३८४८ कोटी ९१ लाख रूपये खर्चासह एक कोटी नऊ लाख रूपये शिलकेचा नवी मुंबई महानगरपालिकेचा २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी मंगळवारी स्थायी समितीला सादर केला. यंदाच्या बजेटमध्ये २०१९-२० आर्थिक वर्षातील तब्बल १२१७ कोटी ७६ लाख रूपये शिल्लक राहिलेल्या रक्कमेचा समावेश आहे. देशातील तिसर्‍या क्रमांकाची आणि श्रीमंत महापालिका म्हणून मिरवणार्‍या नवी मुंबई महापालिकेच्या यंदाच्या बजेटमध्ये काही विशेष नावीन्य दिसले नाही. मागील वर्षीच्या बजेटमधील तब्बल बाराशे कोटींपेक्षा रूपये खर्च न करण्याची नामुष्की महापालिकेवेळ ओढवली आहे.

शिक्षण आणि आरोग्यसारख्या महत्वपूर्ण बाबींसाठी एकूण बजेटमधील ८ टक्के म्हणजे फक्त ३१९ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. महापालिकेच्या ५३ प्राथमिक शाळांमध्ये ३६ हजार ६२७ विद्यार्थी शिकतात. १९ माध्यमिक शाळांमध्ये ५ हजार १५० विद्यार्थी शिकत असून पालिकेने सुरु केलेल्या दोन सीबीएससी शाळांमध्ये १२७२ विद्यार्थी शिकतात. याचबरोबर महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये अनेक सामान्य रुग्ण येतात. हॉस्पिटलच्या चांगल्या इमारती आहेत, मात्र अत्यावश्यक सेवा नसून, स्पेशलिटी डॉक्टर्स उपलब्ध नाहीत. पालिकेने याकडे गंभीरपणे लक्ष देणे गरजेचे अस्ताना शिक्षण आणि आरोग्यासाठी किमान तरतूद केली आहे. आरोग्य आणि शिक्षणासाठी जास्तीत जस्ट तरतूद करण्याच्या शासनाच्या सुचनेकडे पालिकेने कानाडोळा केला आहे.

- Advertisement -

नेरुळ येथील सायन्स पार्क आणि घणसोली येथील क्रीड़ा संकुलाच्या नवीन घोषणेशिवाय अर्थसंकल्पात नवीन प्रकल्प दिसत नाहीत. अनेक वर्षांपासून बजेटमध्ये दिसणार्‍या जुन्याच प्रकल्पांना नवा मुलामा देण्याचा घाट महापालिकेने केला आहे. बजेटवर २५ व २६ फेब्रुवारी रोजी होणार्‍या स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा होऊन अंतिम मंज़ूरीसाठी महासभेमध्ये पाठवले जाईल.बजेटवर २५ व २६ फेब्रुवारी रोजी होणार्‍या स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा होऊन अंतिम मंज़ूरीसाठी महासभेमध्ये पाठवले जाईल.महापालिका अर्थसंकल्पात जमेच्या बाजुमध्ये मिळणार्‍या उत्पन्नामध्ये स्थानिक संस्थेकडून मिळणारा कर १२५० कोटी, मालमत्ता कर ६३० कोटी, विकास शुल्क १२५० कोटी, पाणी पट्टी ११५ कोटी ५९ लाख, परवाना व जाहिरात शुल्क १० कोटी ७ लाख, अतिक्रमण शुल्क ४ कोटी १० लाख, मोरबे धरण व मलनिःसारण ३५ कोटी ६७ लाख, रस्ते खोदाई शुल्क २७ कोटी १५ लाख, केंद्र व राज्य शासन पुरस्कृत योजना १६० कोटी ५६ लाख, संकीर्ण जमा २६३ कोटी ९७ लाख आणि मागील शिल्लक १२१७ कोटी ७६ लाख रुपयांचा समावेश आहे.

तर खर्चाच्या बाबींमध्ये नागरी सुविधा ९८७ कोटी ११ लाख , प्रशासकीय सेवा ६३८ कोटी ६९ लाख, पाणी पुरवठा व मलनिःसारण ५८० कोटी ९१ लाख, इतर नागरी सुविधा ३८९ कोटी ७२ लाख, ई गव्हर्नस २२ कोटी ६५ लाख, सामाजिक विकास ४३ कोटी ७२ लाख, स्वच्छ महाराष्ट्र व घनकचरा व्यवस्थापन , डम्पिंग ग्राउंड ४२९ कोटी १५ लाख, केंद्र व राज्य पुरस्कृत योजना ९० कोटी १८ लाख, आरोग्य सेवा ११६ कोटी ६० लाख, परिवहन सेवा ९६ कोटी, आपत्ती निवारण, अग्निशमन ८५ कोटी ६३ लाख, शासकीय कर परतावा ११६ कोटी ५० लाख, शिक्षण १५२ कोटी ७३ लाख, कर्ज परतावा ३८ कोटी १५ लाख, अतिक्रमण ११ कोटी १२ लाख रूपये आदींचा समावेश आहे.

- Advertisement -

महापालिकेचे २०२०-२१ आर्थिक वर्षात वाशी सेक्टर १७ ते महात्मा फुले चौक , महात्मा फुले चौक ते कोपरी उड्डाण पूलपर्यंत उन्नत मार्ग घनसोली ते ऐरोली पामबिच मार्ग, अगरोली तलाव ते कोकण भवन येथे उड्डाण पूल बांधण्यात येणार आहेत. नेरुळ सेक्टर १९ ए वंडर्स पार्क मधील साडेआठ एकर जमिनीमध्ये सायन्स पार्क बांधण्यात येणार असून घनसोली सेक्टर १३ मध्ये अध्यावत असे क्रीडा संकुल बांधण्यात येणार आहे. याशिवाय नवी मुंबई शहराच्या हद्दीत प्रवेशद्वार उभारण्यात येणार असून तुर्भे येथे मध्यवर्ती ग्रंथालय बांधण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -